मुंबईवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक

  Santacruz
  मुंबईवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न? संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक
  मुंबई  -  

  उत्तर प्रदेश दहशतवादी पथकाने (एटीएस) कारवाई करत लष्कर-ए-तैयबाचा संशयित दहशतवादी सलीम खानला मुंबई विमानतळावरुन अटक केली आहे. 2008 पासून पोलिस या संशयित दहशतवाद्याच्या मागावर होते. काही दिवसांपूर्वी आफताब नावाच्या आयएसआयच्या एजंटला उत्तर प्रदेशच्या फैजाबादमधून अटक करण्यात आली होती. आफताबला सलीम पैसे पुरवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या कारवाईनंतर मुंबईमध्ये पुन्हा घातपात करण्याचा लष्कर-ए-तय्यबाचा डाव होता का? याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

  2008 साली रामपूरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाल्याच्या प्रकरणात कौसर आणि शरीफ या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या दोघांचा जबाब नोंदवला असता संशयित दहशतवादी सलीम हा 2007मध्ये दहशतवादी तळावर ट्रेनिंग घेत होता अशी माहिती त्यांनी जबाबात दिली. त्यानंतर पोलिसांनी सलीमसाठी लुकआऊट नोटीस जारी केली होती. त्याच आधारावर मुंबई एअरपोर्टवर येताच त्याला अडवून अटक करण्यात आली. सलीम खान हा मूळचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूरच्या हातगाव इथला रहिवासी आहे. महाराष्ट्र आणि यूपी एटीएसने संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली.


  यापूर्वीही दोन एटीएसची संयुक्त कारवाई

  यापूर्वी गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करत टाडा कलमाखाली आरोप ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीला बिजनौर येथून अटक केली होती. त्याचे नाव कादीर अहमद असून तो 1993 मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आहे. 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटात टायगर मेमनद्वारे जामनगर येथे शस्त्रास्त्र आणि स्फोटके पुरवण्यात आली होती. त्यात या कादीरचाही समावेश असल्याची माहिती उघड झाली. न्यायालयाने काढलेल्या वॉरंटच्या आधारावर गुजरात पोलिसांनी आरोपी कादीरला अटक केली होती.
  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.