मुंबईत मद्य विक्रीत ५ टक्यांनी घट

एक एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत मुंबईकरांनी एकूण १.४१ कोटी लिटर बिअर खरेदी केल्याची नोंद आहे.

मुंबईत मद्य विक्रीत ५ टक्यांनी घट
SHARES

मुंबईसह राज्यात नववर्ष स्वागताला बनावट दारूंची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या राज्य उत्पादन विभागाने आवळल्या असल्या, तरी मद्यविक्रीत ५ टक्यांनी घट झाली असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवरीतून स्पष्ट झाले आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये बिअर आणि वाईन या दोन्हींच्या विक्रीमध्ये मुंबईत अनुक्रमे ५.१८ टक्के आणि ५.३१ टक्के इतकी घट झाली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी वर्षभरात धडक करवाई केली. राज्यात वर्षभरात पोलिसांनी तब्बल २१८२९ जणांना बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी अटक केली. मुंबईत मागील वर्षी मद्याच्या अवैध निर्मिती, विक्री आणि वाहतूकीसंदर्भात एक हजार ६७८ गुन्हे नोंद झाली आहे. २०१९ डिसेंबरपर्यंत १,२१२ गुन्हे नोंद झाले असून १,०९५ जणांना अटक केली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मधील शेवटच्या आठ महिन्यातच त्यात दुपटीहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. त्याचाच फटका मद्यविक्रीवर दिसून येत आहे.

१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत मुंबईकरांनी एकूण १.४१ कोटी लिटर बिअर खरेदी केल्याची नोंद आहे. २०१८ च्या तुलनेत हे प्रमाण ७.७० लाख लिटरने कमी झाले आहे. दुसरीकडे भारतीय बनावटीची परदेशी लिकर उदाहरणार्थ व्हिस्कीच्या विक्रीमध्ये किरकोळ घट गतवर्षात झाली आहे. ही घट १.०२ टक्के इतकी आहे. देशी बनावटीच्या मद्याच्या विक्रीतही किरकोळ घट झाली आहे. जी ०.५३ टक्के इतकी आहे. सुट्टीनिमित्त राज्याबाहेर जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मद्यप्राशन केल्यानंतर गाडी चालवणाऱ्यांविरोधात सरकारने दंडात्मक रक्कम वाढवली आहे. त्यातच मद्यांच्या किंमतीत होणाऱ्या दरवाढीमुळे नागरिक शक्यतो मद्य घेणं टाळत असल्याचे दिसून येते.



हेही वाचा -

हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू

परदेशात नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा