मालेगाव होतं पुन्हा टार्गेटवर


मालेगाव होतं पुन्हा टार्गेटवर
SHARES

राज्यात घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या चौकशीतून पुन्हा मालेगाव टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमिवर घातपात करण्याचा कट असल्याचं चौकशीतून पुढे आलं आहे. तिघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर बुधवारी पुन्हा एटीएसने १ लॅपटाॅप, २ सीपीयू, १ इनोव्हा कार, ४ एअर पिस्तुल, २० एअर पिस्तुल, १ नोटबुक, १ डायरी, ३ मोबाइल, ३ सिमकार्ड, २ सुट्टे कागदपत्र जप्त करण्यात आल्या आहेत.


घातपातीचा रचला कट

मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपींना दिलेल्या वागणुकीचा आणि त्याच्यावर केलेल्या अत्याचाराचा सूढ घेण्याच्या उद्देशानेच हा घातपातीचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणाची सर्व सूत्र ही गोव्यातून एका संघटनेच्या कार्यालयातून देण्यात येत होती. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी गोव्यातील या संघटनेच्या कार्यालयावर एटीएससह इतर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष केंद्रीत केल्याने येणाऱ्या बकरी ईदचा डाव हा वैभव आणि त्याच्या साथीदारांवर सोपवला होता. 


३५ ते ४० जणांची चौकशी

या प्रकरणात आतापर्यंत एटीएसने ३५ ते ४० जणांची चौकशी केली आहे. त्याच बरोबर अहमदनगर येथील पार्सल बॉम्बशी आरोपींचा संबंधाबाबतही दहशतवाद विरोधी पथक पडताळणी करणार आहे. अहमदनगर येथील पार्सल बॉम्बप्रमाणेच आरोपींकडेही कमी क्षमतेचे बॉम्ब सापडले आहेत. याबाबत न्यायवैधक प्रयोगशाळेची मदत घेण्यात येणार आहे.


कारवाईनंतर साठा जप्त

शनिवारी तिन्ही आरोपींकडे केलेल्या चौकशीनंतर एटीएसने रविवारी नालासोपारा येथे केलेल्या विशेष कारवाईत १ लॅपटाॅप, २ सीपीयू, १ इनोव्हा कार, ४ एअर पिस्तुल, २० एअर पिस्तुल, छऱ्यांचे मचिसच्या आकारांचे बाॅक्स, १ नोटबुक, १ डायरी, ३ मोबाइल, ३ सिमकार्ड, २ सुट्टे कागदपत्र असा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एटीएसने या प्रकरणाचा फास आरोपींभोवती आणखी आवळला असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.


हेही वाचा -

वैभव राऊतने उघडला होता घातक शस्त्रांचा कारखाना

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा