वेब सिरिजच्या नावाखाली अश्लिलता पसरवणारे 'सात अॅप' वादात, सायबर पोलिसात गुन्हा दाखल

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मनोरंजन करू पाहणार्यांना खिळवून ठेवणे. त्यासाठी त्यांनी सर्व मर्यादा तोडून अश्लिल व्हिडिओ आणि शिव्यांचा सर्रास वापर सुरू केला

वेब सिरिजच्या नावाखाली अश्लिलता पसरवणारे 'सात अॅप' वादात, सायबर पोलिसात गुन्हा दाखल
SHARES
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रसिद्धीच्या झोतात आलेला प्रकार म्हणजे हे वेब सीरीज, पण या वेब सीरीजच सगळ्यात मोठ लक्ष्य आणि हेतू हा असतो की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मनोरंजन करू पाहणार्यांना खिळवून ठेवणे. त्यासाठी त्यांनी सर्व मर्यादा तोडून अश्लिल व्हिडिओ आणि शिव्यांचा सर्रास वापर सुरू केला, माञ हेच आता वेब सिरिज दाखवणाऱ्या सात प्रमुख अॅपला चांगलेच महागात पडणार आहे. या सात नामकिंत अॅपवर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचाः- ऑक्सफर्ड डिक्शनरीत मोठे बदल, लिंगभेद करणारे शब्द टाळणार

केंद्र सरकारने नुकतीच ८२७ पॉर्न साइटवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे लैंगिक अत्याचार कमी होतील असं सांगण्यात येत होतं परंतू गेले २ ते ३वर्षांपासून वेब सीरीज ने सोशल मीडिया जगतात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या वेब सीरीज मध्ये सुप्रसिध्द कलांवतानीही प्रवेश केल्याने आजच्या तरूणाईचा या वेबसीरीजकडे मोठ्‌याप्रमाणात कल वाढला आहे, यातील उत्तेजित करणारी दृश्‍य आपल्या संस्कृतीला व तरूणाईला मोठ्‌याप्रमाणात हानीकारक आहेत. सरकारने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे लक्षत घेऊनच वेब सिरिजमध्ये अश्लिल व्हिडिओ आणि शिव्या वापरणाऱ्या प्रोड्युसर, डायरेक्टर, अभिनेता यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास सुरूवात केली. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रसिद्धीच्या झोतात आलेला प्रकार म्हणजे हे वेब सीरीज, पण या वेब सीरीजच सगळ्यात मोठ लक्ष्य आणि हेतू हा असतो की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मनोरंजन करू पाहणार्यांना खिळवून ठेवणे. त्यामुळे अश्लिल व्हिडिओ आणि शिव्या या सारखे विविध प्रकार या वेबसिरीजमध्ये अवलंबले जातात. त्याचबरोबर साध्या विनोदा बरोबरच व्दीर्थी विनोदांचा सुद्धा आधार यात घेतला जातो.  त्याबद्दल आधीच दर्शकांची माफी मागितलेली एक सुचना दाखवली जाते. त्या आधारावर देशातील ६० टक्के पेक्षाही जास्त वर्ग या वेब सीरीज ने खेचून घेतला आहे. 

हेही वाचाः- आतापर्यंत रेल्वेतील 'इतक्या' रेल्वे कर्मचारी, कुटुंबीय सदस्यांचा कोरोनामुळं मृत्यू

याच वेब सिरिजमधील अश्लील व्हिडिओ सिनने सर्व मर्यादा ओलांडल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी त्याची गंभीर दखल  देशातल्या सात प्रमुख अॅपवर कलम २९२, ६७,६७(अ) भा.द. आयटी अॅक्ट २००० अंतर्गत  गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रामुख्याने "हाॅटशूट, नेओफ्लिक्स, फ्लिज मूव्ही, फेनिओ, कुको, उल्लू, हाॅटमस्ती, चिकू फ्लिक्स, अल्ट बालाजी, प्राईमफ्लिक्स यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा