नशेसाठी खोकल्याचं औषध, नियंत्रणासाठी प्रयन्न सुरू- अनिल देशमुख

राज्यात सिंथेटीक ड्रग्ज व्यापाराला अटकाव घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

नशेसाठी खोकल्याचं औषध, नियंत्रणासाठी प्रयन्न सुरू- अनिल देशमुख
SHARES

राज्यात सिंथेटीक ड्रग्ज व्यापाराला अटकाव घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकांमार्फत ही मोहीम राबविली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानसभा सदस्य अबू आजमी यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ पथकाने मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थसंबंधी गुन्ह्यातील २२ आरोपींना अटक झाली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्यात काही कंपन्यांचं खोकल्याचं औषध हे नशेकरिता घेतलं जातं. त्यासंदर्भात कशापद्धतीने नियंत्रण आणता येईल याबाबत राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. औषध दुकानांमध्ये अशाप्रकारच्या औषधांचा साठा हा नियंत्रित रहावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर केंद्र शासनाबरोबर चर्चा करुन योग्य ती पावले उचलण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिंथेटीक ड्रग्ज विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येईल. अशी मोहीम राबविणारे महाराष्ट्र पहिलं राज्य असेल, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राहुल कुल, आशिष शेलार, रवींद्र वायकर यांनी भाग घेतला.

(maharashtra government trying to control uses of synthetic drugs says home minister anil deshmukh)


हेही वाचा- 

वाढत्या कोरोनामुळं पुन्हा 'धारावी पॅटर्न' सुरू

पक्ष्यांपासून माणसांमध्ये ‘बर्ड फ्लू’ झाल्याची नोंद नाही- सुनील केदार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा