Advertisement

रिक्षातील महिलांचे दागिने-बॅग चोरणारे सराईत चोरटे अखेर पोलिसांच्या हाती

मुंबईतल्या पश्चिम उपनगरात रिक्षातून प्रवास करणार्या महिलांच्या अंगावरील दागिने, हातातील बँग हिसकावून चोरी करणार्या चोरट्याचा मालाड पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला आहे.

रिक्षातील महिलांचे दागिने-बॅग चोरणारे सराईत चोरटे अखेर पोलिसांच्या हाती
SHARES

मुंबईतल्या पश्चिम उपनगरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने, हातातील बँग हिसकावून चोरी करणाऱ्या चोरट्याचा मालाड पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला आहे. हे दोघे ही सराईत आरोपी असून त्याच्यावर मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.


दुचाकीवरून बॅगेची चोरी

मालाड परिसरात राहणाऱ्या मालाड परिसरतल्या ओबेराॅय माॅलजवळ या दोघांनी १५ जानेवारी रोजी रिक्षात बसलेल्या एका वृद्ध महिलेची बॅग दुचाकीवरून येऊन हिसकावली. या प्रकरणी मालाड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने काही तासात या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चौकशीत या दोघांनी आपली नावं समीर मुक्रम शेख (२४) , बरकत अली शौक अली शेख (२४) अशी असल्याचं सांगितलं. यातील समीर हा मालाडच्या मालवणी परिसरात राहणारा आहे. तर शेख हा नायगावचा राहणारा आहे.


दोघंही सराईत आरोपी

अशा प्रकारे गुन्हा करण्याची ही त्याची पहिलच वेळ नसून हे दोघंही सराईत आरोपी आहेत. त्याच्यावर अशा प्रकारे विलेपार्ले, वनराई, बांगूरनगर, जोगेश्वरी, अंधेरी, कांदिवली या पोलिस ठाण्यात तब्बल १७ गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व गुन्ह्यात पोलीस त्याच्या मागावर होते. या पूर्वी ही त्यांना अनेक वेळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र जामीनावर मुक्त होते हे दोघे पुन्हा चोऱ्या करायचे. या प्रकरणी मालाड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बनसोडे हे तपास करत आहेत.हेही वाचा -

धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत कोठडी

अंधेरी गोळीबारप्रकरणी रवी पुजारीच्या आणखी तीन हस्तकांना नाशिकमधून अटकसंबंधित विषय
Advertisement