कीडा गँगपासून सावधान

 Malad
कीडा गँगपासून सावधान

मालाड - आतापर्यंत चड्डी गँग, बनियन गँग अशा अनेक लुबाडणाऱ्या आणि चोऱ्या करणाऱ्या गँग तुम्ही ऐकल्या असतील. पण आता या गँगमध्ये आणखी एका गँगची जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे कीडा गँग. मालाड, मालवणी भागात ही गँग सध्या धुमाकूळ घालतेय. याप्रकरणी मालाड पोलिसांनी एकाला अटक केली. अफजल शेख असे या आरोपीचे नाव आहे.

मालाड स्टेशन ते मालवणीला जाणाऱ्या बसमधल्या प्रवाशांना ही टोळी लुबाडायची. या टोलीतील एक जण बसमध्ये बॅग असणाऱ्या प्रवाशाच्या बाजूला उभा राहायचा. बाजूला उभा राहून बॅगेत काय आहे याची पडताळणी तो करत असे. त्यानंतर तुमच्या अंगावर कीडा असल्याची बतावणी तो प्रवाशाला करायचा. प्रवासी शर्टावर कुठे कीडा आहे हे बघण्यात व्यस्थ झाले की ते हातचलाखी करून बँगेतील सामान लंपास करायचे. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी अफजल शेखला अटक केली. त्याच्या साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

Loading Comments