मेट्रोमध्ये महिलेचा व्हिडिओ काढणारा अटकेत


मेट्रोमध्ये महिलेचा व्हिडिओ काढणारा अटकेत
SHARES

मुंबईच्या मेट्रोतून प्रवास करणे महिलांसाठी असुरक्षित मानले जात आहे, याचा प्रत्यय अाज वांद्रे इथं राहणाऱ्या एका महिलेला अाला. अंधेरी ते मरोळ असा मेट्रोतून प्रवास करत असताना एक तरुण ३० वर्षीय महिलेचा व्हिडियो अापल्या मोबाईलमध्ये चित्रीत करत असतानाचा प्रकार घडला अाहे. व्हिडिअो काढणाऱ्या या २९ वर्षीय तरुणाला अंधेरी पोलिसांनी अटक केली अाहे. या तरुणाने हातचलाखीने हा व्हिडियो डिलिट केला असला तरी पोलिसांनी तो मोबाईल जप्त करून महिलेची व्हिडियो क्लिप मिळवण्याच्या उद्देशाने कलिना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हा मोबाईल पाठवला आहे.


करत होता पाठलाग

वांद्रे परिसरात राहणारी ही महिला बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी अंधेरीच्या मरोळ परिसरात आली होती. मित्राला भेटल्यानंतर ती त्याच्यासोबतच मेट्रोने घरी परतत होती. त्यावेळी काही वेळापासून एक व्यक्ती अापला सतत पाठलाग करत असल्याचे तिच्या लक्षात आले. हा अारोपी मेट्रो प्रवासादरम्यान तिचे मोबाईलमध्ये व्हिडियो शूट करत होता. ही बाब महिलेसह तिच्या मित्राच्या लक्षात अाल्यानंतर त्यांनी या तरुणाला हटकले.


हातचलाखीने व्हिडियो केला डिलिट

त्यानंतर मेट्रोतील सहप्रवाशांच्या मदतीने या महिलेने त्या तरुणाकडे जाब विचारला. त्यावेळी या प्रकरणातून सुटण्यासाठी तरुणाने हातचलाखीने महिलेचा व्हिडियो डिलीट केला. या प्रकरणी पीडित महिलेने आरोपीला पकडून अंधेरी पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात भा.दं. वि. कलम ३५४, ५०४, ५०८ कलमानुसार गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

४० कोटी प्रवाशांची 'मेट्रो सफर'

गर्लफ्रेंडसमोर अपमान करणे वकिलाला पडलं महाग

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा