लोन देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत


लोन देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत
SHARES

कोणतीही कागदपत्रं नसताना अमूक एक लाखांचं कर्ज मिळेल, अशा जाहिराती अापण विविध ठिकाणी पाहत असतो. पण कुणाकडूनही कर्ज घेताना सावधान. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता अाहे. मुंबईतल्या नागरिकांना कर्ज देण्याच्या नावाखाली त्यांना लुबाडणाऱ्या टोळीचा पायधुनी पोलिसांनी पर्दाफाश केला अाहे. दिल्लीतून ही टोळी कार्यरत असून त्यांनी मुंबईतील अनेक नागरिकांना गंडा घातला अाहे. अनुपकुमार अग्रहारी (२५) असं या आरोपीचं नाव असून त्याचा सहभाग माटुंगा येथील एका फसवणुकीच्या गुन्ह्यातही आढळून आला आहे. न्यायालयाने त्याला २७ आँगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


रिलायन्स कॅपिटलच्या नावाने फोन

तक्रारदार यांचा पायधुनी परिसरात परफ्यूमचा व्यवसाय आहे. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी ते त्याच्या दुकानात असताना, अनोळखी नंबरहून फोन अाला. रिलायन्स कॅपिटलमधून बोलत असल्याचे सांगत, लोन हवे आहे का अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी तक्रारदार यांनी १० लाखापर्यंत कर्ज मिळेल का, असे विचारले असता समोरील व्यक्तीने त्यास होकार दिला. त्यानुसार समोरील आरोपीने तक्रारदार यांना reliancecapital.bk0@financier.com या ईमेल आयडीवर कागदपत्रे मागवली. त्यानंतर स्टॅम ड्यूटीच्या नावाखाली तक्रारदाराकडून १ लाख ३५ हजार उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आल्यानंतर त्याने थेट मदतीसाठी पोलिसात धाव घेतली.


पोलिसांचा संशय खरा ठरला

याअाधी माटुंगा पोलिसांनी अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाच जणांना अटक केली होती. त्या फसवणुकीत अग्रहारीचा सहभाग होता. त्यानुसार पायधुनी पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली. त्याच्याजवळून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सामग्री हस्तगत केली आहे. अनेकांना त्यानं अशाप्रकारे गंडवले असल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. न्यायालयाने त्याला २७ आँगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा -

दाभोलकर, लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलातून! सीबीआयचा दावा

रईस चित्रपटातून सुचली ड्रग्ज तस्करीची कल्पना



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा