मुलुंडमध्ये 'गोलमाल'चा 'उंगलीमॅन'!


SHARE

गोलमाल चित्रपटात अभिनेता अजय देवगणला कुणीही बोट दाखवलं की, त्याचा पारा वर चढतो आणि तो समोरच्याचे बोट मोडतो असे दाखवण्यात आले आहे. असाच काहीसा किस्सा मुलुंडमध्ये पहायला मिळाला आहे. एटीएमच्या फसवणुकीत अटकेत असलेल्या एका रोमेनियन नागरिकाला तपास अधिकारी वारंवार बोट दाखवत असल्याने राग अनावर झाला आणि त्या आरोपीने चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या बोटाचाच चावा घेतल्याची घटना घडली आहे.


नक्की घडलं काय?

मुलुंडच्या एटीएम मशिनमध्ये कार्ड स्कॅनिंगद्वारे नागरिकांना लाखो रुपयांना गंडवण्यात आले होते. या प्रकरणी नवघर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीच्या नोएडा येथून मरिन दुमित्रु ग्रामा आणि लोलेन लुसियन मिलु या दोघांना अटक केली होती. यावेळी दोन्ही आरोपी पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे तपास अधिकारी वारंवार त्या आरोपींकडे बोट दाखवून त्यांना हिणवत होता. त्याच्या या कृत्याचा राग आरोपी मरिन दुमित्रु ग्रामा याला अनावर झाल्याने त्याने थेट तपास अधिकाऱ्याच्या बोटाचाच चावा घेतला!आरोपी अट्टल गुन्हेगार

या दोन्ही आरोपींना यापूर्वी एटीएम स्किमिंगच्या गुन्ह्यांमध्ये 2015 माध्ये अटक झाली होती. त्यावेळी त्यांच्याकडून 28 लाख रुपये व 497 बनावट एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले होते. त्यावेळी जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपीने पुन्हा हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.


एटीएममधून लाखोंची केली लूट

मुलुंड येथील खासगी बँकेच्या एटीएममध्ये या दोन्ही रोमेनियन नागरिकांनी 17 आणि 18 डिसेंबर रोजी स्कॅनर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने बनावट कार्डद्वारे क्लोनिंग करून अनेकांच्या खात्यातून लाखो रुपये काढले होते. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. रात्रीच्या वेळेस एटीएमला सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून आरोपींनी 11.59 ते 1 वाजताच्या सुमारास ही चोरी केली होती. या प्रकरणी नवघर पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.हेही वाचा

पत्नीनंच पतीला सुपारी देऊन संपवलं, ११ वर्षानंतर लागला छडा


संबंधित विषय