कुर्ला स्थानकात लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या

कुर्ला स्थानकावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. सेतू राम बिहारचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

कुर्ला स्थानकात लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या
SHARES

कुर्ला स्थानकात लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सेतू राम (३५) असं या प्रवाशाचं नाव आहे. मंगळवारी रात्री १०.५० च्या सुमारास सेतू राम कुर्ला स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर उभा होता. यावेळी लोकल आली असता त्याने अचानक लोकलसमोर उडी मारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 

 कुर्ला स्थानकावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. सेतू राम बिहारचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सेतू राम एलटीटीवरून बिहारला जात होता. सेतू राम यांच्या पॅन्टमध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. चिट्टीत चार क्रमांक होते. पोलिसांनी कॉल केल्यानंतर3 नंबर नॉट रिचेबल होते तर एका क्रमांकावर संपर्क झाला आहे. बबिता देव या महिलेशी पोलिसांचा संपर्क झाला असून त्यांची मृत सेतू रामसोबत ओळख पटली आहे.कुर्ला स्थानकावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. सेतू राम बिहारचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सेतू रामने लोकलखाली उडी मारल्यानंतर त्याच्या शरीरापासून मानेचा भाग बाजूला गेला. त्यानंतर धडाचे पोस्टमार्टम करण्यात आले. सेतू राम एलटीटीवरून बिहारला जात होता. त्याने रेल्वे रूळावर उडी का मारली हे समजू शकलेले नाही. पोलिसांकडून अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे.हेही वाचा -

हिमालय पूल दुर्घटनेतील आरोपी तुरूंगाबाहेर, आॅडिटरचाही समावेश

२२ किलो गांजासह ५ जणांना अटक
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा