'त्याने' चक्क पोलिसांचीच शाळा घेतली

एलटी मार्ग पोलिस ठाण्यातही त्याचा अायुक्तांचा भेटण्याचा घोशा सुरूच होता. सुरूवातीला पोलिसांना तो मद्यपान करून आला असल्याचा संशय आला. मात्र, पेहराव अाणि बोलण्यावरून चांगल्या घरातील वाटत असल्याने तेथील पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

'त्याने' चक्क पोलिसांचीच शाळा घेतली
SHARES

वेळ मध्यरात्री १ वाजताची. क्राॅफर्ड मार्केट येथील पोलिस मुख्यालयाबाहेर एका व्यक्तीची तेथील पोलिसांना पोलिस अायुक्तांना भेटण्याची विनंती.... पोलिसांनी त्याची विचारपूस करून काय काम अाहे विचारल्यावर, महत्त्वाची बातमी अाहे पण मी फक्त पोलिस अायुक्तांनाच सांगणार, असा त्याचा हट्ट. थेट साहेबांना भेटण्यापेक्षा अाम्हाला सांगा तुमची काय समस्या अाहे, असं पोलिसांनी सांगून पाहिलं.  पण हा इसम पोलिसांचं एेकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हता. अखेर तेथील ड्युटीवरील पोलिसांनी त्याला एलटी मार्ग पोलिस ठाण्यात नेलं.


अायुक्तांचा भेटण्याचा घोशा 

एलटी मार्ग पोलिस ठाण्यातही त्याचा अायुक्तांचा भेटण्याचा घोशा सुरूच होता.  सुरूवातीला पोलिसांना तो मद्यपान करून आला असल्याचा संशय आला. मात्र, पेहराव अाणि बोलण्यावरून चांगल्या घरातील वाटत असल्याने तेथील पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही अायुक्तांना भेटण्यावर तो ठाम होतो. अखेर बराच वेळ त्याची समजूत काढल्यावर त्याने घडलेला प्रकार सांगितला.


ओबेराॅय, अंबानींना मारण्याचा कट 

मूळचा साताऱ्याच्या कोरेगावचा रहिवाशी असलेला विनायक बर्गे हा शनिवारी रात्री मुंबईत आला होता. मराठी चित्रपट बनवण्यासाठी त्याला पैसे गुंतवायचे होते. मात्र, त्याच्या सहकाऱ्याने त्याला सोमवारी भेटण्यासाठी बोलावले. त्यामुळे तोपर्यंत मुंबई दर्शन करण्याचं त्याने ठरवलं. शनिवारी रात्री तो जुहू बीचवर फिरत होता. त्यावेळी तीन जण उदयोगपती ओबेराॅय, अंबानी यांना मारण्याचा कट रचत असल्याचं त्याने ऐकलं. ही माहिती देण्यासाठी मी पोलिस मुख्यालय गाठलं, असं त्याने पोलिसांना सांगितलं. अंबानी, ओबेराॅय यांना मारण्याचा कट एेकल्यावर पोलिस अलर्ट झाले. पोलिस उपायुक्तांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाठवलं.


पोलिस किती अलर्ट अाहेत? 

पोलिस मद्यरात्री जुहू चौपाटीवर त्या तीन संशयितांचा शोध घेत होते. मात्र, तपासात पोलिसांना काही अाढळलं नाही. मात्र, विनायकच्या बोलण्यात वारंवार तफावत अाढळून अाली. त्यामुळे तो खोटे बोलत असल्याचा पोलिसांना संशय अाला. पोलिसांनी त्याला खडसावून विचारलं. तेव्हा त्याने अापण हा सर्व बनाव रचल्याचं पोलिसांना सांगितलं. बनावाचं कारण एेकून तर पोलिसांची तळपायाची आग मस्तकात गेली. मुंबई पोलिस किती अलर्ट अाहेत हे मला बघायचं होतं, असं उत्तर त्याने दिलं. त्याने चक्क पोलिसांची शाळा घेतली होती. चिडलेल्या पोलिसांनी मात्र विनायकला चांगलाच धडा शिकवला. पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात ५०५(२),१७७, १०२ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली अाहे.  


कायदेशीर कारवाई 

साताऱ्यातील कोरेगावमध्ये राहणारा विनायक एक श्रीमंत व्यक्ती अाहे. मात्र, त्याने पोलिसांना खेळवत त्यांचीच शाळा घेतली. पोलिसांनी त्याला चांगलंच झापत कायदेशीर कारवाई केली अाहे. त्यामुळे पोलिसांसोबत टिंगल- टवाळी करणं त्याच्या अाता अंगलट अालं अाहे. अाणि त्याला हे चांगलचं महागात पडणार अाहे.




हेही वाचा - 

बोगस गुणपत्रिका प्रकरण : विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक

३ नायझेरियन तस्कर जेरंबद; कोकेन, हेराॅईन हस्तगत




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा