धक्कादायक! रेल्वे स्टेशनवर विकृताकडून तरुणीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न


धक्कादायक! रेल्वे स्टेशनवर विकृताकडून तरुणीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न
SHARES

नवी मुंबईच्या तुर्भे रेल्वे स्थानकावर एका 43 वर्षाच्या विकृतानं तरुणीचं जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान तरुणीने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिथून पळही काढला. मात्र, सीसीटीव्ही फूटेज आणि सतर्क असलेल्या रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला अवघ्या काही तासांतच पकडले.आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तुर्भेत राहणारी २० वर्षांची तरुणी घणसोली येथील एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती ऑफिसला जाण्यासाठी तुर्भे स्थानकावर आली होती. तुर्भे स्थानकात लोकल ट्रेनची वाट बघत मोबाईलवर आलेले मेसेज वाचत उभी होती. त्याचवेळी मागून आलेल्या एका विकृताने तिला मागून मिठी मारत तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी पूर्णपणे घाबरली. वेळीच तिने त्या विकृताच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत त्याचा प्रतिकार केला. त्यावेळी त्या विकृताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता आरपीएफचे कॉन्स्टेबल निलेश दळवी आणि राहुल कुमार यांनी तातडीने प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. आरोपी हा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन मधील सब-वेतून जात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली.

नरेश के जोशी असं या विकृत आरोपीचं नाव आहे. अधिक तपासासाठी हा गुन्हा आता वाशी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या या आरोपीचा ताबा वाशी पोलिसांनी घेतला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय