अंडरवेअरमुळे वाचलं लाखाेंचं सोनं


अंडरवेअरमुळे वाचलं लाखाेंचं सोनं
SHARES

पवईमधील सोनाराचे अपहरण करून त्याला लुबाडणाऱ्या सराईत टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. 13 जून रोजी 39 वर्षाच्या जितेश परमार नावाच्या व्यापाऱ्याचे त्याच्या नोकरासह या टोळीने अपहरण केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेने एकूण सात आरोपींना अटक केली आहे.


आरोपींची नावे

अनवर सय्यद (26), यूनुस उर्फ शेरू सय्यद (21), रेहान शेख (36), निजाम मकरानी (20), समीर शेख (28) तबेरेस अंसारी (20) और जितेंद्र सिंह (27).


काय आहे हे प्रकरण?

लक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान जितेश परमार यांच्या मालकीचे आहे. 13 जूनला जितेश परमार आपले पवई येथील ज्वेलर्सचे ज्वेलर्सचे दुकान बंद करून बाईकने घरी जात होते बंद करून बाईकने घरी जात होते. यावे त्यांच्यासोबत दुकानात काम करणारे कर्मचारी देखील होते. त्यावेळी एल. अँड. टी. पुलावर एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना रस्ता दुभाजक (डिव्हायडर)वर दाबून पाडले आणि जितेशसह त्याच्यासोबत असलेल्या नोकराला बळजबरीने गाडीत घातले. जितेश यांचे ज्वेलर्सचे दुकान असल्याचे आरोपींना माहीत होते. त्यांच्याकडून दुकानाच्या चाव्या घेऊन ते लुटण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यांनी गाडीतच जितेशची झडती घेतली. पण त्यांना काही मिळाले नाही म्हणून त्यांना मारहाण केली. तरीही चावी न मिळाल्याने दरोडेखोरांनी चाकू चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवला. पण दुकानाची चावी झटापटीत पडल्याचे त्यांनी या दरोडेखोरांना सांगितले.

जितेशकडील सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, रुद्राक्षांची सुवर्ण माल रोख रक्कम असा एकूण 1 लाख 78 हजारांचा ऐवज घेऊन या दरोडेखोरांनी जितेश आणि त्याच्या नोकराला दुसऱ्या दिवशी दुपारी घोडबंदर रोडवर सोडले. विशेष म्हणजे चावी ही काही झटापटीत पडली नसून ती जितेश यांनी त्यांच्या अंडरविअरमध्ये लपवली होती आणि मारहाण होऊन देखील त्यांनी या दरोडेखोरांना त्याचा थांगपत्ता लागू दिला नाही हे विशेष.


...आणि आरोपींची पोलिस ठाण्यात रवानगी

मिळालेल्या खबरीवरून गुन्हे शाखेने कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून अजून काही आरोपी फरार आहेत. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीवरून यातील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. सध्या गुन्हे शाखा पुढील तपास करत असून या आरोपींची रवानगी पवई पोलिस ठाण्यात केली आहे.हे देखील वाचा - 

नोकरानेच पळवले 35 लाखांचे दागिनेडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय