लग्नात फुकटचे जेवायला गेला...यजमानांकडून मार बसला अन् स्कूटरही गमावली..

मुंबईतील गोरेगावमध्ये जेवणासाठी लग्नात घुसणे एका तरूणाला महागात पडले आहे.

लग्नात फुकटचे जेवायला गेला...यजमानांकडून मार बसला अन् स्कूटरही गमावली..
SHARES

थ्री इडियट हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. यातील लग्नातील भन्नाट सीन तुम्हाला आठवतोय का? आठवत असेलच, ज्यात तीन मित्र एका  अनोळखी लग्नात जेवायला जातात आणि पकडले जातात. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. 

मुंबईतील गोरेगावमध्ये जेवणासाठी लग्नात घुसणे एका तरूणाला महागात पडले आहे. 

13 जून रोजी गोरेगावचा रहिवासी जावेद कुरेशी त्याच्या 17 वर्षीय चुलत भाऊ आणि काही मित्रांसह बाहेर गेला होता. जोगेश्वरीला त्यांचे लक्ष एका कम्युनिटी हॉलकडे वेधले जेथे लग्नाची पार्टी सुरू होती.

वधू-वरांच्या कुटुंबीयांशी संबंध नसतानाही सर्व तरुणांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला आणि जेवण करायला सुरुवात केली.

ते जेवण करत असताना यजमान कुटुंबातील काही लोक त्यांच्या जवळ आले आणि त्यांच्याशी बोलू लागले.

ओशिवरा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “पुरुष विनाआमंत्रित आल्याचे लक्षात येताच यजमान आक्रमक झाले. कुटुंबाने त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. घाबरून ते बाहेरच्या दिशेने पळू लागले, असे पोलिसांनी सांगितले. 

सगळे तरूण हॉलच्या बाहेर रस्त्यावर आले असता, पाहुण्यांनी हस्तक्षेप केला आणि यजमान कुटुंबाला मारहाण करण्यापासून रोखले, असे पोलिसांनी सांगितले.

“जावेद कुरेशीला या गोंधळात पार्किंगमध्येच आपली स्कूटर राहिल्याचे आठवले. त्याने तिथेच असलेल्या एका व्यक्तीला स्कूटर आणून देण्याची विनंती केली. कुरेशीला वाटले की तो व्यक्ती लग्नात आलेल्या पाहुण्यांपैकीच आहे. म्हणून त्याने चावी त्याच्याकडे दिली. पण तो व्यक्ती स्कूटर घेऊन पसार झाला, अशी माहिती पोलिस अधिका-याने दिली. 

शनिवारी कुरेशीने ओशिवरा पोलिस ठाण्यात संपर्क साधला जेथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कुरेशीवर विश्वासभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा

17 हजार खर्च करून फेशियल केले पण चेहराच जळाला

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माता असित मोदीविरोधात एफआयआर दाखल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा