मणिपुरी विद्यार्थिनीसोबत लोकलमध्ये छेडछाड, कुणीही धावलं नाही मदतीला

एका २२ वर्षांच्या मणिपुरी विद्यार्थिनीसोबत छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ११ सप्टेंबर रोजी हार्बर मार्गावरील वाशी ते गोवंडी स्थानकादरम्यान घडल्याचं म्हटलं जात आहे.

मणिपुरी विद्यार्थिनीसोबत लोकलमध्ये छेडछाड, कुणीही धावलं नाही मदतीला
SHARES

मुंबईत आपल्या युरोपीयन मित्रासोबत लोकल ट्रेनचा प्रवास करणाऱ्या २२ वर्षांच्या मणिपुरी विद्यार्थिनीसोबत छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ११ सप्टेंबर रोजी हार्बर मार्गावरील वाशी ते गोवंडी स्थानकादरम्यान घडल्याचं म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही छेडछाड होत असताना डब्यात उपस्थित एकही प्रवासी तिच्या मदतीसाठी पुढे सरसावला नाही.


नेमकं काय झालं?

या पीडित विद्यार्थिनीने सोमवारी वाशी रेल्वे पोलिसांत जाऊन रितसर तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारीत तिने म्हटलं आहे की, ११ सप्टेंबर रोजी हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी स्थानकातून तिने गोवंडीच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. या लोकल ट्रेनमधील जनरल डब्यात एका अज्ञात व्यक्तीने तिची छेड काढली.


पळ काढायला संधी

पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा तिने आपल्या मित्रासोबत छेडछाड करणाऱ्या या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा डब्यात उपस्थित कुठल्याही सहप्रवाशांनी तिची मदत केली नाही. याच गोष्टीचा फायद उठवून आरोपीने पळ काढला. त्यानंतर शनिवारी या विद्यार्थिनीने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये या सर्व प्रकाराची माहिती दिली.



हेही वाचा-

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

गणेशोत्सवाच्या गर्दीत चार दिवसात १३५ मोबाइल चोरीला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा