तनुश्रीच्या वकिलांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे पोलिस आयुक्तांना भेटून अर्ज देणं शक्य नसल्याने मेलद्वारे ही विनंती करण्यात आल्याची माहिती वकील नितीन सातपुते यांनी दिली.

तनुश्रीच्या वकिलांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार
SHARES

तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक आरोप प्रकरणात काहीच पुरावे मिळत नसल्याची कबुली ओशिवरा पोलिसांनी जूनमध्ये न्यायालयात दिली होती. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता तनुश्रीच्या वतीने तिचे वकील नितीन सातपुते यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मेलद्वारे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. यामुळे नानांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

आॅनलाइन तक्रार

मंगळवारी मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे पोलिस आयुक्तांना भेटून अर्ज देणं शक्य नसल्याने मेलद्वारे ही विनंती करण्यात आल्याची माहिती वकील नितीन सातपुते यांनी दिली. ऑनलाइन तक्रार दाखल करत पोलिस आयुक्तांना मेलद्वारे तक्रार कळवण्यात आली आहे. तसंच गुरुवारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तपास हस्तांतरित करण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचंही सातपुते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने 'मी टू' या चळवळीअंतर्गत केला होता. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात नाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


हेही वाचा-

तनुश्री दत्ताच्या विनयभंगप्रकरणी नाना पाटेकरांना दिलासा, पुरावा नसल्याचा पोलिसांचा अहवाल

मी-टू प्रकरणात नाना पाटेकरांना क्लीन चीट ही अफवा



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा