Advertisement

मी-टू प्रकरणात नाना पाटेकरांना क्लीन चीट ही अफवा

तनुश्री दत्तानेही या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून नाना पाटेकर यांना कुणीही क्लीन चीट दिलेली नाही. नाना पाटेकर यांना काम मिळत नसल्याने त्यांच्या टीमकडून अशा अफवा पसरवल्या जात असल्याचं प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं.

मी-टू प्रकरणात नाना पाटेकरांना क्लीन चीट ही अफवा
SHARES

प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांना अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या लैंगिक छळ प्रकरणात क्लीन चीट मिळाल्याची अफवा सोशल मीडियावर सकाळपासून फिरत होती. यावर खुलासा करताना ओशिवरा पोलिसांनी नाना पाटेकर यांना कुठलीही क्लीन चीट मिळालेली नाही, असं सांगितलं आहे. 

तनुश्री दत्तानेही या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून नाना पाटेकर यांना कुणीही क्लीन चीट दिलेली नाही. नाना पाटेकर यांना काम मिळत नसल्याने त्यांच्या टीमकडून अशा अफवा पसरवल्या जात असल्याचं प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं. 

काय आहे प्रकरण?

२००८ साली गोरेगावच्या फिल्मसिटीत ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमातील एका गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरकृत्य केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. त्यानंतर तिने या सिनेमातून अचानक माघार घेतली होती. 

मी टू चळवळ

त्यानंतर परदेशातून भारतात आल्यावर तिने गेल्या वर्षी ‘मी-टू’चळवळीत सहभागी होत नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा आरोप केले. त्याची दखल घेत ७ महिन्यांपूर्वी ओशिवरा पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांना अद्याप कुठलाही साक्षीदार मिळालेला नाही. तरीही या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. 

पोलिस तपास सुरू असतानाच शनिवारी नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. या प्रकरणात कोणालाही क्लीन चिट दिली नसल्याचं परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त परमजीतसिंग दहिया यांनी सांगितलं आहे.  हेही वाचा-

तनुश्रीचे सर्व आरोप खोटे; नानाच्या वकिलांचं महिला आयोगाकडे लेखी उत्तर

राखी सावंतचा तनुश्री दत्तावर २५ पैशांचा मानहानीचा दावासंबंधित विषय
Advertisement