मुंबईतील 'या' बार-रेस्टॉरंटमधील २४५ जणांवर कारवाई

बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील 'या' बार-रेस्टॉरंटमधील २४५ जणांवर कारवाई
SHARES

मुंबईच्या ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळ असलेल्या 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' वर कारवाई करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागातील पथकानं या हॉटेलवर धाड टाकून तब्बल २४५ विनामास्क असलेल्या नागरिकांवर कारवाई केली. तसंच, अनेक जणांवर कोरोना महामारीअंतर्गत गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईतील स्थिती अद्याप बिकट नाही. मात्र, अजूनही कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊनपासून दूर राहू शकतो, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, व्यापारी, दुकानदार आणि हॉटेल व बार व्यवसायिकांनाही नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनेक हॉटेल्स आणि बार रेस्टॉरंटमध्ये कोरोना नियम धाब्यावर बसविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली. कोरोना विषयक कारवाईत मास्क न परिधान करणं आणि सामाजिक अंतर न राखणं या शासनाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल एफ. आय. आर. नोंदविण्यात आला आहे. तसंच, हे रेस्टॉरन्ट आणि बार' महापालिकेने ठराविक काळासाठी सीलही करण्यात आलं आहे.

रेस्टॉरंटमधील २४५ लोकांकडून १९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांना कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही लोकांमध्ये गांभीर्य दिसत नसून विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात दिसून येते. 



हेही वाचा -

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा