अल्पवयीन मुलीवर ४०० जणांकडून ६ महिने बलात्कार, पोलिसाचाही समावेश

पीडितेनं नोंदवलेल्या तक्रारीनुसार बालविवाह कायदा, बलात्कार, विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर ४०० जणांकडून ६ महिने बलात्कार, पोलिसाचाही समावेश
SHARES

रविवारी, १३ नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्रातील बीडमध्ये एका अल्पवयीन विवाहित मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तिघांना अटक करण्यात आली आहे, असं वृत्त प्रकाशित झालं आहे. एसपी बीड राजा रामासामी यांनी सांगितलं की, पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती आहे.

रामासामी यांनी स्पष्ट केलं की, पीडितेनं नोंदवलेल्या तक्रारीनुसार बालविवाह कायदा, बलात्कार, विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या सहा महिन्यांत अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी बलात्कार केल्याचा दावा देखील केला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पीडितेचा लैंगिक गैरफायदा घेतल्याचा आरोप पोलीस अधिकाऱ्यावरही केला जात आहे.

लोकमतनं दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आईचे जवळपास दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. एका वर्षाहून अधिक काळ ती तिच्या सासरच्या घरी होती पण नंतर ती तिच्या पालकांच्या घरी गेली. कारण तिच्या सासरच्यांनी तिचा छळ केला, असा दावा पीडित मुलानं केला आहे. त्यानंतर ती नोकरीच्या शोधात अंबेजोगाई शहरात गेली.

अंबेजोगाई इथं दोन व्यक्तींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा तिनं केला. ज्यांनी तिला नोकरी देण्याचे वचन दिले होते. नंतर, तिच्यावर एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेक लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. लैंगिक शोषणामुळे ती गर्भवती राहिल्याचा दावा तिनं केला आहे.



हेही वाचा

मुंबईच्या NCB पथकाची मोठी कारवाई; १५०० किलो गांजा जप्त

गुजरात ड्रग्सचं महाराष्ट्र कनेक्शन, एकाला अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा