अल्पवयीन मुलावर अल्पवयीन मुलांचा लैंगिक अत्याचार


अल्पवयीन मुलावर अल्पवयीन मुलांचा लैंगिक अत्याचार
SHARES

एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर तब्बल वर्षभरापासून अनैसर्गिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या अंधेरी परिसरात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या मुलावर लैंगिक आत्याचार करणारी 15 मुले ही देखील अल्पवयीन आहेत.

पोलिसांनी या 15 मुलांपैकी 7 मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना मंगळवारी डोंगरी येथील ज्युवेनाईल जस्टीस बोर्डसमोर हजर करण्यात आले. त्यांनतर त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथे हा सगळा प्रकार जवळपास वर्षभरापासून सुरू होता. हा 15 वर्षांचा मुलगा आपल्या आजीसोबत रहात असून त्याच्या आसपास राहणारी मुलेच त्याचे शारिरीक शोषण करत होती. कधी मैदानात तर, कधी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्याच्यावर शारिरीक अत्याचार केले जात होते. शेवटी हे सर्व असह्य झालेल्या पीडित मुलाने हा सगळा प्रकार आपल्या मित्राला सांगितला. त्यानंतर हा मित्र मुलासोबत पोलिस ठाण्यात गेला आणि या प्रकाराला वाचा फुटली.


या प्रकरणी आम्ही कलम 377 (अनैसर्गिक अत्याचार) आणि बाल कायद्याच्या कलम 4, 6, 8 आणि 12 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वसंत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी. एन. नगर पोलिस ठाणे

या प्रकरणातील पीडित मुलगाच नाही, तर आरोपी मुलेही अल्पवयीन आहेत. त्यामुळे आता या मुलांना लैंगिक शिक्षणासह समुपदेशन करण्याची गरजही निर्माण झाली आहे का? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.


मानसोपचार तज्ज्ञांना काय वाटते?


या प्रकरणातील सर्व मुले समलैंगिक आहेत असे म्हणता येणार नाही. त्यातील एक दोघे जण असूही शकतील. या मुलांना मी संधीसाधू म्हणेन, जिथे एखादी गोष्ट लगेच मिळण्यासारखी आहे, तिथे तिचा उपभोग होतो. एकाचे बघून दुसरा करतो अशातला हा प्रकार आहे. या प्रकरणात मुलगी पीडित असती, तर त्याचा गवगवा झाला असता, मुलगा असला की कोणी एवढे लक्ष देत नाही. याचा देखील या मुलांनी फायदा उचलला असावा.

राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ




हेही वाचा -

लैंगिक शोषणाने 2 मुलांचा बळी, वैद्यकीय तपासणीत उघड

कांदिवलीत दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा