मुंबईतून चोरलेले मोबाइल वापरले जातात नेपाळमध्ये

पोलिसांनी चोरीचे मोबाइलघेऊन नेपाळमध्ये पळण्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईत चोरांना अटक केली आहे.

मुंबईतून चोरलेले मोबाइल वापरले जातात नेपाळमध्ये
SHARES

मुंबईत भूरट्या चोरांची काही कमी नाही. दिवसाला कमीत कमी ५० ते १०० मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंदवल्या जात असतील. मात्र हेच चोरलेले मोबाइल शोधत पोलिस आरोपींपर्यंत पोहचत असल्याचे लक्षात आल्यानंतर आऱोपींनी आता चोरलेले मोबाइल नेपाळमध्ये विकण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका टोळीचा वडाळा  टीटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  पोलिसांनी चोरीचे मोबाइलघेऊन नेपाळमध्ये पळण्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईत चोरांना अटक केली आहे.

हेही वाचाः- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह

वडाळाच्या संगमनगर परिसरात २७ एप्रिलरोजी म्हणेच लाँकडाऊनमध्ये एक मोबाइलचे दुकान फोडून त्यातील महागडे मोबाइल आणि पैसे चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिस ठाण्यात कलम ३८०,४५७ भा द वि अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानुसार वडाळा टीटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र पासलवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलिस  निरीक्षक अजय बिराजदार, एएसआय तांबडे,पोलिस शिपाई देशमुख, भोसले, पवार यांच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. चोरी झालेल्या दुकानाच्या अवती भवती असलेल्या मार्गावरील शेकडो सीसीटिव्ही तपासल्यानंतर आरोपींविषयी थोडी माहिती मिळाली. खबऱ्यांच्या  मार्फत पोलिसांनी आरोपीं ओळख आणि सध्याचा ठिकाणा माहिती करून घेतला.  

हेही वाचाः- Diwali 2020: दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई

त्यावेळी आरोपी अस्लम उर्फ सिराज मिराज खान, हारून जमील तेली, मो इम्रान उर्फ डबला नजीर खान यांची ओळख पटली. हे तिन्ही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशचे असून त्यांच्या गावाजवळून नेपाळची सीमाही जवळ आहे. हे आरोपी अटकेच्या भितीने नेपाळमध्ये पळण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता बिराजदार यांच्या पथकाने तिघांना उत्तरप्रदेशमधून अटक केली. या तिघांजवळून पोलिसांनी ३३ महागडे मोबाइल हस्तगत केले आहेत. नेपाळ, बांगलादेशमध्ये गरीबी असल्याने तेथे सेंकड हॅड मोबाइलला सर्वात  जास्त मागणी असते. तसेच पोलिस मोबाइलचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या देशात जाण्याची शक्यता कमी म्हणून चोरट्यांनीही शक्कल लढवल्याचे कळते. हे तिघेही सराईत आरोपी असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा