मुंबई विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग

मुंबई विद्यापीठातील रानडे भवनमध्ये शिकणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणं सकाळच्या लेक्चरसाठी कलिना कॅम्पसमध्ये आली. त्यावेळी ती जवळच्या स्वच्छतागृहात गेली असता तिला मागून एका अज्ञात व्यक्तीनं पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये एका विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात विद्यार्थिनीनं विद्यापीठाच्या महिला विकास कक्षासह जवळच्या पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे


नेमकं प्रकरण काय? 

मुंबई विद्यापीठातील रानडे भवनमध्ये शिकणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणं सकाळच्या लेक्चरसाठी कलिना कॅम्पसमध्ये आली. त्यावेळी ती जवळच्या स्वच्छतागृहात गेली असता तिला मागून एका अज्ञात व्यक्तीनं पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीनं प्रतिकार केला असता तिला धक्का देत खाली पाडलं व त्यानं तिथून पळ काढला. त्यामुळे या मुलीला त्याचा चेहरा पाहता अाला नाही. घडलेल्या या प्रकारामुळं या मुलीला मानसिक धक्का बसला आहे.


सुरक्षा वाढवली

या प्रकाराने विद्यापीठ प्रशासनाची झोप उडाली असून विद्यापीठातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पीडित विद्यार्थिनीनं याबाबत विद्यापीठाच्या महिला विकास केंद्रात लेखी तक्रार दाखल केली असून सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस व महिला विकास केंद्रामार्फत सुरू आहे. तसचं पीडित विद्यार्थिनीला या धक्क्यातून सावरता यावं यासाठी विद्यापीठ तिच्या समुपदेशनाची जबाबदारी घेणार आहे.


पीडित विद्यार्थिनीने त्या अज्ञात व्यक्तीला प्रतिकार करण्यापूर्वीच त्यानं तिथून पळ काढला होता. आजूबाजूला सीसीटिव्ही नसल्यानं त्याला शोधण्यात अडचणी येत आहे. पीडित विद्यार्थिनीनं विद्यापीठ महिला विकास कक्षात तक्रार दाखल केली आहे. तसंच विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेसाठी ७० लाखांची तरतूद करण्यात आली अाहे.
- दिनेश कांबळे, रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा -

नालासोपाऱ्यासह, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये होता घातपाताचा डाव!

ब्राऊन शुगरच्या तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा