‘अँटिलिया’ प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे- अनिल देशमुख

‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.

‘अँटिलिया’ प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे- अनिल देशमुख
SHARES

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कंबाटा हिल परिसरातील ‘अँटिलिया’  निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.

त्याआधी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित गाडीच्या मालकाविषयी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थासहित सापडलेली स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. ही गाडी सॅम पीटर न्यूटन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांचं गॅरेज असून गाडीच्या अंतर्गत सजावटीसाठीचे (इंटिरिअर) गॅरेजचे पैसे मूळ मालकाने न दिल्याने त्यांची गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती.

शुक्रवारी ठाण्यातील रेतीबंदर या ठिकणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही खुणा नाहीत. ठाणे पोलीस त्याची चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सर्व बाबी स्पष्ट होतील. महाराष्ट्र पोलीस, मुंबई तसंच ठाणे पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सक्षम आहेत, असंही अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीमालकाचा मृत्यू, गौडबंगाल असल्याच्या फडणवीसांच्या दाव्याने खळबळ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी, अशी मागणी विधानसभेत केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’कडून करण्यात येईल, असं निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना, या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेले गाडी मालक मनसुख हिरेन यांना तात्काळ सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणी केलेली असतानाच त्यांचा मृतदेह मुंब्रा इथं सापडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात जे काही योगायोग तयार झालेत, त्यातून संशय निर्माण होत आहे. यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याने हे प्रकरण तात्काळ एनआयकडे वर्ग केलं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली होती.

(mukesh ambani residence antilia case handover to maharashtra ats says anil deshmukh)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा