पाॅलिसीवर बोनस देण्याचा फोन आलाय? सावध व्हा!

लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर बोनस देण्याचं आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश चिखले (२६), राजेश मगदुम (३३), संजय मानकर (२७) या तिघांना नुकतीच अटक केली.

पाॅलिसीवर बोनस देण्याचा फोन आलाय? सावध व्हा!
SHARES

लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर बोनस देण्याचं आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश चिखले (२६), राजेश मगदुम (३३), संजय मानकर (२७) या तिघांना नुकतीच अटक केली. या तिघांनी मुलुंडमधील एका डाॅक्टरला ३ लाख रुपयांना गंडवल्याचं पुढं आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करत त्यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपये हस्तगत केले आहेत. या प्रकरणात अन्य काही जणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.


कसं फसवलं डाॅक्टरला?

मुलुंड परिसरात राहणाऱ्या डाॅ. राजेश्वर हरिश्चंद्र यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये 'भारती एक्सा लाइफ सिक्यूअर्ड इन्शुरन्स' या तीन पाॅलिसी कंपनीच्या एजंटकडून काढल्या होत्या. त्यानुसार कंपनीचा कर्मचारी राजेश्वर यांच्याकडून दोन वेळा हप्ता घेऊन गेला. तर एकदा राजेश्वर यांनी त्यांच्या बँकेतून हप्ता भरला.


प्रोसेसिंग फी घेतली

त्यानंतर कोरगावकर नावाच्या व्यक्तीने राजेश्वर यांना फोन करून तुमच्या पाॅलिसीवर १ लाख ४६ हजार बोनस रक्कम मिळाल्याचं सांगून त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून ३ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये रमेश शिंदे नावाचा एक व्यक्ती राजेश्वर यांच्या घरी येऊन पैसे घेऊन गेला.


वेळोवेळी फसवणूक

त्यानंतर पुन्हा एकदा प्रफुल पटेल नावाच्या व्यक्तीने याचप्रकारे राजेश्वर यांच्याकडून प्रोसेसिंग फी म्हणून ३ हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा समीर नावाचा व्यक्ती प्रोसेसिंग फी च्या नावाखाली डाॅक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊन ५ हजार रुपये घेऊन गेला. एवंढ कमी की काय हप्त्याच्या नावाखाली या टोळीने पुढच्याच महिन्यांत १६ हजार रुपये डाॅक्टरकडून उकळले. मात्र पैसे भरूनही बोनसचे पैसे न मिळाल्याने डाॅक्टरने संबंधित व्यक्तींना फोन केल्यावर त्यांनी डाॅक्टरला उडवाउडवीची उत्तरे दिली.


३ लाखांची फी दिली

काही दिवसांनी या टोळीने पुन्हा डाॅक्टरशी संपर्क करून तुम्हाला पाॅलिसीमागे ३२ लाख रुपयांचा बोनस मिळणार असून त्यासाठी ३ लाख १५ हजार रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल असं सांगितलं. त्यावर विश्वास ठेवून डाॅक्टरने पुन्हा फोनवरून देण्यात आलेल्या खात्यावर पैसे जमा केले.


मुंबईबाहेर जाळं

मात्र वारंवार प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे देऊनही बोनस न आल्याने डाॅक्टरने मुलुंड पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांना राकेश शिंदे, रमेश उगले, मुरलीधर देशमुख, कुमार मालुसरे यांना यापूर्वी अटक केली होती. तर या गुन्ह्यात आकाश चिखले, राजेश मगदुम, संजय मानकर याचा ही सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली.

या टोळीने आतापर्यंत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, भुसावळ येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे गंडवल्याची कबुली दिली आहे. या टोळीकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पाॅलिसीचा डाटा, रजिस्टर जप्त केलं आहे.



हेही वाचा-

उसने पैसे देण्यास नकार दिल्यानं वेश्येची हत्या

बांधायच्या होत्या मुंडावळ्या हातात पडल्या बेड्या!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा