बेपत्ता मुलाला शोधण्यात पोलिसांना अखेर यश

 Mulund
बेपत्ता मुलाला शोधण्यात पोलिसांना अखेर यश
Mulund, Mumbai  -  

बेपत्ता झालेल्या मुलाला तब्बल तीन महिन्यांनंतर शोधण्यात मुलुंड पोलिसांना यश मिळाले आहे. 2 जानेवारी रोजी 14 वर्षीय मुलगा आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. तेव्हा मुलाच्या वङिलांनी म्हणजे रणवीर सिंह रावत यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलुंड, ठाणे परिसरात शोध सुरू केला. तसेच नातेवाईकांची देखील चौकशी सुरू केली. परंतु तपास लागला नाही. 

रणवीर सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा ऊच्च न्यायालयाने येत्या पाच दिवसांत हा तपास सीआयडीकडे सुपूर्द केला होता. मात्र दोनच दिवसांत मुलुंड पोलिसांनी गुप्तहेरांच्या मदतीने बेपत्ता मुलाला शोधण्यात यश मिळवले. तसेच एका संशयितालाही ताब्यात घेतले. बेपत्ता मुलगा सदर संशयितासोबत मंगळवारी गोरेेगावमध्ये सापडल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली. दरम्यान, मुलाला आश्रय देणाऱ्या शंकर छगुराम यादव (28) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading Comments