सायन-पनवेल हायवेवरील विचित्र अपघातात ३० वाहने एकमेकांना आदळली

सुदैवाने या अपघातांत जिवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सायन-पनवेल हायवेवरील विचित्र अपघातात ३० वाहने एकमेकांना आदळली
SHARES

लोकल सर्व सामन्य व्यक्तींसाठी बंद असल्याने मुंबईतल्या सायन-पनवेल महामार्गावर वाहतूकीची वरदळ ही वाढली आहे. त्यामुळेच छोट्या मोठ्या अपघातामुळे सायन-पनवेल हायवे कायम चर्चेत असतो. बुधवारी देखील एका विचित्र अपघातात ३० वाहने एकमेकांना आदळल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही कोंडी फुटली. सुदैवाने यात कुणी जखमी जरी झाले नसले. तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे कळते.   

हेही वाचाः- दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

मुंबईत कोरोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमिवर लोकल ही सर्व सामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. याचाच ताण मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवर दिसून येत आहे. पनवेलहून मुंबईला प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मागील काही वर्षांमध्ये वाढलेली आहे. याच मार्गावर मुंबई-पुणे आणि पुढे कोकणात जाणारे रस्ते आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस उद्भवू लागली आहे. अशातच त्या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने त्यात भर पडली आहे. त्यात रस्त्यातील खड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला जरी असला. तरी अपघाताचे प्रमाण हे वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.  बुधवारी अशाच एका विचित्र अपघातामुळे ३० गाड्या एकमेकांना धडकल्या, बुधवारी सकाळी १०.१५ वाजता कळंबोली उड्डाणपुल चढून गाड्या भरधाव वेगात खाली उतरत असताना समोर रस्त्यावर पडलेले खड्डे बुवण्याचे काम सुरू होते.  त्यामुळे वेगात आलेल्या गाड्यात त्या ठिकाणी येऊन ब्रेक घेत होत्या, त्यावेळी एका वाहनचालकाने वेगात असलेल्या गाडीला थांबवण्यासाठी अचानक ब्रेक घेतल्यामुळे मागून येणारी एका मागोमाग एक ३० वाहने एकमेकांना आदळली.

हेही वाचाः- मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त

सुदैवाने या अपघातांत जिवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातामुळे त्या परिसरात काही काळासाठी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वेळीच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा