गुंतवणुकीच्या नावाखाली ७०० जणांना कोट्यवधींचा गंडा, दाम्पत्याला अटक

१०० दिवसात दीडपट परतावा देण्याचं आमिष दाखवून ७०० जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्याला अटक केली अाहे.

गुंतवणुकीच्या नावाखाली ७०० जणांना कोट्यवधींचा गंडा, दाम्पत्याला अटक
SHARES

गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याच्या नावाखाली ७०० जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्याला मुंबई अार्थिक गुन्हे शाखेने अटक केली अाहे. रईसा पुनावाला (४३) व तिचा पती मुस्तफ्फा बेग (४०)  अशी या आरोपींची नावे आहेत. या दाम्पत्याला महाराष्ट्र प्रोटेक्‍शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॅझिटर्स (एमपीआयडी) कायद्याअंतर्गत अटक केली अाहे.


१०० दिवसात दीडपट परतावा 

सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या पुनावाला आणि बेग यांनी २०१२ ते २०१७ या कालावधीत आरएस ट्रेडर्स नावाने कंपनी सुरू केली होती. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना १०० दिवसात दीडपट परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं. सुरूवातीला आरोपींनी काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे पैसेही दिले. त्यामुळे मुंबई अाणि मुंबई बाहेरील ७०० लोकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली.


४० लाखांपर्यंत गुंतवणूक

रईसाच्या पहिल्या पतीने मोठ्या रकमेची गुंतवणूक कंपनीच्या विमा योजनेत केली. गुंतवणूक योजना बुडाली तरी गुंतवणूकीची रक्कम परत करू, असं अाश्वासन गुंतवणूकदारांना देण्यात अालं होतं. त्यामुळे ५० हजार ते ४० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक अनेक गुंतवणूकदारांनी केली. पण १०० दिवसांनंतर अारोपींनी कुठल्याही रकमेचा परतावा दिला नाही. अारोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. पैसे मिळण्याची अाशा मावळल्यानंतर गुंतवणूकदारांनी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आला. अखेर याप्रकरणी नुकतीच आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा -

चोरी करणाऱ्या मोलकरणीला ६ तासात अटक

गँगस्टर छोटा राजनच्या हस्तकाला १५ वर्षानंतर अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा