चोरी करणाऱ्या मोलकरणीला ६ तासात अटक


SHARE

घरात नोकर कामावर ठेवताना त्यांची पूर्ण चौकशी करूनच ठेवावे. अन्यथा एखादी विपरीत घटना घडू शकते. अशीच एक घटना चिंचपोकळीच्या एका उच्चभ्रू वसाहतीत घडली आहे. एका वर्षापासून घरात काम करणाऱ्या मोलकरणीने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ४२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मुंबईच्या चिंचपोकळी भागातील रहिवासी असलेल्या देराजकुमार संघवी या व्यावसायिकाच्या घरात २३ जुलै रोजी ही घटना घडली.


नेमकं प्रकरण काय

चिंचपोकळी येथील शांतीकमल को.ऑ.हौ.सो. येथे वास्तव्यास असलेले देराज कुमार संघवी यांच्या घरात गेल्या एक वर्षांपासून महिला घरकाम करत होती. तिचे नाव दुकडदुकी (२६) असं  आहे. तिने अापला पती राजेश शेख (३०) याच्या मदतीने मालकाच्या घरातील १२६० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ लाख रुपये रोख रक्कम असा एकूण २४ लाख  ८० हजारांचा माल लंपास केला. संघवी यांच्या लक्षात येताच त्यांनी काळाचौकी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. मात्र, ही महिला पश्चिम बंगाल येथील विरभूमीची रहिवासी असून तिच्याबद्दल इतर काहीच माहिती मालकाकडे उपलब्ध नव्हती.

पोलिसांनी तात्काळ रेल्वे, सरकारी आणि खाजगी बस डेपो, आरपीएफ, स्थानिक पोलीस यांच्याशी संपर्क करून अवघ्या ६ तासात आरोपी महिला व तिच्या पतीला अटक केली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.हेही वाचा - 

गँगस्टर छोटा राजनच्या हस्तकाला १५ वर्षानंतर अटक

'त्या' सायकल चोराला अखेर अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या