'त्या' सायकल चोराला अखेर अटक

सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून रात्रीच्या वेळीस महागड्या सायलक चोरी करणाऱ्या २५ वर्षीय सराईत आरोपीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद आरिफ मोहम्मद शरीफ अन्सारी असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं आतापर्यंत १७ महागड्या सायकल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

'त्या' सायकल चोराला अखेर अटक
SHARES

मुंबईतल्या उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून रात्रीच्या वेळीस महागड्या सायलक चोरी करणाऱ्या २५ वर्षीय सराईत आरोपीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद आरिफ मोहम्मद शरीफ अन्सारी असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं आतापर्यंत १७ महागड्या सायकल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.


महागड्या सायकलींची चोरी

अंधेरी, पवई, जोगेश्वरी भगातील उच्चभ्रूवस्तीतील महागड्या सायकल चोरीला जात असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या सायकल चोरीचं प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. मिळेल ते पुरावे पोलिस तपासत होते. याचदरम्यान अंधेरीच्या मरोळ परिसरात राहणाऱ्या ज्युजर मोईज भारमल या व्यापाऱ्याच्या घरासमोरून त्याची सायकल चोरीला गेल्याची तक्रार पवई पोलिसांकडे आली.


आरोपी पोलिसांच्या हाती

जून महिन्यांतच ज्युजर यांनी सायकल खरेदी केली होती. याबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवून शोध सुरू केला. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली होती. याचदरम्यान पवई परिसरात शनिवारी मोहम्मद आरिफ हा संशयास्पद रित्या फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने असमाधानकारक उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर त्याने सायकल चोरीची कबुली दिली. 


१७ सायकली पोलिसांच्या ताब्यात

मागील तीन महिन्यांत त्याने जोगेश्वरी, अंधेरी, पवई, मरोळ नाका, जे. बी नगर, एमआयडीसी परिसरातून १७ सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. या १७ सायकलीं पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून अधिक तपास सुरू असल्याचं पवई पोलिसांनी सांगितलं.


हेही वाचा -

आयआयटी बॉम्बेमधील सायकल कुणी पळवली? हे कळाल्यावर तुम्हीही थक्क व्हाल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा