मोबाइलवरील खेळाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडित मुलगी बुधवारी रात्री ८.३० वा. तिच्या घरासमोरील अंगणात खेळत असताना. सिंग याने तिच्या हाताला पकडून तिला मोबाइलवर गेम खेळायला देतो असे सांगून नेले

मोबाइलवरील खेळाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
SHARES

मुंबईच्या कुर्ला परिसरात ७ वर्षाच्या मुलीला मोबाइलवरील खेळाचे आमीष दाखवून २० वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वि.भा.नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात कलम ३७६, (२),आय, ३४२, भा.द.वी कलमांसह पोस्को, ४,८,१२ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचाः- आज मध्यरात्रीपासून मालाडच्या मढ भागात टोटल लॉकडाऊन

कुर्लाच्या बैलबाजार परिसरात पीडित ७ वर्षाची मुलगी ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. त्याच परिसरात आरोपी जगदीश सिंग हा देखील राहतो. पीडित मुलगी बुधवारी रात्री ८.३० वा. तिच्या घरासमोरील अंगणात खेळत असताना. सिंग याने तिच्या हाताला पकडून तिला मोबाइलवर गेम खेळायला देतो असे सांगून नेले, सिंगहा ओळखिचाच असल्याने मुलीने त्याला विरोध न करता ती त्याच्यासोबत नेली. घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन सिंगने मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरूवात केली. सिंग तिच्यासोबत जबरदस्ती करू लागल्याने मुलीने आरडा ओरडा करण्यास सुरूवात केली. मुलीचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या मुलीने सिंगच्या घरात खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

हेही वाचाः- वाहतूककोडींवर पर्याय; मुंबई पोलिसांची ‘सॅगवे’ने गस्त

या घटनेची माहिती शेजारील महिलेने मुलीच्या कुटुंबियांना दिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी जगदिश सिंगला अटक केली. जगदिशने या पूर्वी ही अशा प्रकारे कुठल्या मुलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे का ? याचा पोलिस शोध घेत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा