पत्नीसोबत राहू देत नसल्याने नवऱ्याकडून सासूची हत्या


पत्नीसोबत राहू देत नसल्याने नवऱ्याकडून सासूची हत्या
SHARES

पत्नीसोबत राहू देत नसल्याच्या रागात नवऱ्याने ५५ वर्षीय सासूची गळा आवळून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बोरिवलीत समोर आला आहे. या प्रकरणी बोरिवली जीआरपीने सुरज उर्फ राजू यादव (२२) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. यामधील मुख्य आरोपी सलीम शेख मात्र अद्याप फरार आहे.

रविवारी बोरिवली स्थानकातील फ्लॅट क्रमांक १० वर अतिशय दुर्गंध येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. हा वास पत्र्याच्या एका तात्पुरत्या शेडमधून येत असल्याने जीआरपीने ते शेड उघडले. शेडची पाहणी केली असता त्यात सिमेंटच्या पिशव्यांच्या आत एका महिलेचा मृतदेह सापडला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे हे कठीण होते.

शेड जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या शेडमधून बाहेर पडताना आम्हाला दोन व्यक्ती दिसले, आम्ही आरोपींचा शोध घेत असतानाच आम्हाला एक संशियित तरुण प्लॅटफॉर्म नंबर १० वर दिसला, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी साधर्म्य असल्याने आम्ही त्याला तपासासाठी ताब्यात घेतले. चौकशीत सुरज उर्फ राजू यादव नावाच्या आरोपीने गुन्हा कबुल केला
- पुरुषोत्तम कराड, डीसीपी, जीआरपी पश्चिम रेल्वे

पोलीस पुढे म्हणाले, 'सलीम शेखची सासू सीताबाई ही त्याला त्याच्या पत्नीसोबत राहू देत नसे, सलीमपासून दूर ठेवण्यासाठी तिने पिंकी नावाच्या आपल्या मुलीला सहा महिन्यांसाठी गावाला देखील नेले. त्यामुळे सलीमच्या मदतीने त्याच्या सासूची हत्या केल्याची कबुली राजूने दिली.

सात सप्टेंबरला सलीमने आपल्या सासूचा काटा काढण्याचे ठरवले, त्याने राजूच्या मदतीने सीताबाईची गळा आवळून हत्या केली आणि तिथून पळ काढला. पण अद्याप सलीम फरार असून त्याचा पोलीस शोध आहेत.


हेही वाचा - 

मध्यस्थी पडली महागात, आईस्क्रीमचे पैसे देण्यावरून एकाची हत्या

पत्नीची हत्या करणाऱ्या नवऱ्याला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा