गोरेगावमध्ये हुक्का पार्लरच्या मालकाविरोधात बलात्काराचा गुन्हा


गोरेगावमध्ये हुक्का पार्लरच्या मालकाविरोधात बलात्काराचा गुन्हा
SHARES

गोरेगावच्या 'रॉयल स्मोक हुक्का पार्लर'च्या मालकाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच हुक्का पार्लरमध्ये रविवारी एका मुलाची शुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली होती. नासीर अन्सारी असं या मालकाचं नाव असून दोन्ही गुन्ह्यात सध्या तो फरार आहे.


लग्नाच्या आमिषाने फसवणूक

दोन दिवसांपूर्वी गोरेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून, २५ वर्षीय मुलीने लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप नासीर अन्सारीवर केला आहे. लग्नाची वेळ आल्यावर लग्नास नकार दिल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नासीर विरोधात ३७६ ( बलात्कार ) ५०६ ( मारण्याची धमकी देणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली आहे.


रविवारी झाली हत्या

गोरेगावच्या रॉयल स्मोक हुक्का पार्लरमध्ये रविवारी मयूर पांचाळ नावाच्या २६ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. या हुक्का पार्लरमध्ये छोट्याश्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली, ज्यात मयूर पांचाळला भोसकण्यात आलं होत. उपचारादरम्यान कूपर रुग्णालयात मयूरचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंत गोरेगाव पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.



हेही वाचा -

६० बाईक्सचे पैसे घेऊन शोरूम मालक फरार, ग्राहकांची मोठी फसवणूक

लोकलपाठोपाठ मेट्रो स्थानकावरही महिलेचा विनयभंग


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा