IPS Transferred मुंबईचे सह पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांची बदली


IPS Transferred मुंबईचे सह पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांची बदली
SHARES

मुंबईचे सह पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्तपदी बदली करण्यात आलेली आहे. राज्यसरकारने मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. मात्र रस्तोगी यांच्यासह अन्य पाच अधिकाऱ्यांच्यांही बदलीची आँर्डर राज्यसरकारे काढले आहे. रस्तोगी हे गुन्हे शाखेचे सहआयुक्त असताना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुख्यात गुंड इजाज लकडावालाच्या मुस्क्या आवळण्यात आल्या होत्या. अंडरवल्डला  हादरवाणारी मागील दोन वर्षातील ही मोठी घटना असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा ः- salon and beauty parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती

१९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले संतोष रस्तोगी यांचे आयआयटी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले होते. यूपीए सरकारच्या काळात संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या व हाय प्रोफाइल नेते असलेल्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासात रस्तोगी यांची महत्त्वाची भूमिका होती. रस्तोगी यांनी सुरुवातीला अत्यंत संवेदनशील असणाऱ्या अकोला व मलकापूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते राज्यपालांचे सहायक होते. त्यांनी सिंधुदुर्ग अधीक्षक, मुंबई पोलिस उपायुक्त, बीड अधीक्षक, ठाणे उपायुक्त व जळगाव येथे यशस्वीरित्या कार्य केले आहे. २०१०मध्ये ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीबीआय येथे गेले होते. रस्तोगी यांचा आर्थिक व सायबर गुन्ह्यांच्या तपासात हातखंडा होता. मुंबईत ते गुन्हे शाखेचे सहआयुक्त असताना, अनेक बड्या गुन्हेगारांच्या मुस्क्या त्यांनी आवळल्या, त्याच्या कार्यकाळात कुख्यात गुंड इजाज लकडावाला पोलिसांनी केलेली अटक ही सर्वात मोठी कारवाई होती. कुख्यात गुंड छोटा राजनच्या अटकेनंतर अंडरवल्डमधील  ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा