पंतगीच्या नादात १० वर्षाच्या मुलावर अपघातात ओढवला मृत्यू


पंतगीच्या  नादात १० वर्षाच्या मुलावर अपघातात ओढवला मृत्यू
SHARES

मकर संक्रातीच्या दिवशी आकाशात पंतगीची पेज खेळण्याची जुनी परंपरा आहेत. याच पतंगीच्या पेज खेळताना, दुसऱ्याची कापलेली पंतग पकडे कांदिवलीतील १० वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतले आहे. संक्रांतीनिमित्त पतंग उडवायला बाहेर पडलेला मुलगा घरी परतलाच नाही. पतंग पकडण्याच्या नादात  कांदिवलीत राहणाऱ्या दुर्वेश जाधव शेणाच्या ढिगात पडून त्याचा गुदमरून मृत्यू झाला .

हेही वाचाः- मुंबईत सोमवारपासून शाळा सुरु होणार?

संक्रांतीच्या दिवशीच या भयंकर बातमीने मुंबई हादरली आहे. पतंगाचा खेळ इतक्या करुण पद्धतीने जीव घेईल याचा विचारही या चिमुरड्याच्या घरच्यांनी केला नसेल. गुरुवारी दुपारी दुर्वेश जवळच्या इतर मित्रांबरोबर पतंग उडवायला बाहेर पडला होता. एका काटलेल्या पतंगाच्या मोहात तो त्याच्या मागे धावत राहिला.  पतंग पकडण्यासाठी गोठ्याशेजरच्या शेणाच्या मोठ्या ढिगाजवळ तो गेला. त्या शेणाच्या ढिगावरच नेमका पतंग जाऊन पडला. दुर्वेशने त्यावर उडी मारली आणि काही अंदाज यायच्या आतच त्याचा पाय खोलात गेला. शेणाने भरलेल्या त्या जागेत तो अक्षरशः बुडू लागला. मदतीसाठी आरडा ओरडा सुरू झाला. प्रचंड गलका वाढला. पण त्या शेणाच्या टाकीत उतरणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकण्यासारखं होतं. दुर्वेशला वाचवण्यासाठी आलेले हतबल झाले. तो शेणात दिसेनासा होईपर्यंत कुणीच काही करू शकलं नाही.

हेही वाचा ः- ‘ती’ मलाही जाळ्यात अडकवत होती, भाजप नेत्याच्या एन्ट्रीने मुंडे प्रकरणाला वेगळं वळण

पोलीसांनाही घटनास्थळी पोहोचूनही तातडीने त्या शेणात उतरवणं शक्य नव्हतं. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत कुणाला काहीच करता आलं नाही. शेजारच्या इमारतीच्या कामावर असलेल्या मजुरांनी क्रेनच्या साहाय्याने दुर्वेशला बाहेर काढलं. अखेर सर्व आयुध घेऊन दुर्वेशपर्यंत पोहोचेपर्यंत त्या चिमुरड्याचा शेणात गुदमरून जीव गेला होता. कांदिवलीच्या रुग्णालयात त्याला दाखल केलं, तेव्हाच त्याचा जीव गेलेला होता. पोलिसांनी या प्रकरण अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. कांदिवली पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा