बनावट कोविड रिपोर्ट देणारा गजाआड

अशाप्रकारे जवळपास ३७ नागरिकांचे बनावट कोविड अहवाल तयार केल्याचं समोर आलं.

बनावट कोविड रिपोर्ट देणारा गजाआड
SHARES

बनावट covid-19 अहवाल (Fake Covid 19 Report) बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चारकोप पोलीस स्टेशन इथं ६ एप्रिलला चारू चौहान नावाच्या महिलेनं चारकोप पोलीस स्टेशनमध्ये येऊन एक तक्रार दिली.

महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या covid-19 अहवालात छेडछाड केल्याचा संशय होता. त्यानुसार या महिलेनं एक लेखी तक्रार चारकोप पोलिसांना दिली. त्यानुसार चारकोप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी तात्काळ या महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना तपास करता पाठवले.

पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी तपास केला असता एका नामांकित लॅब टेक्निशियन मोहम्मद सलीम मोहम्मद उमर यानं महिलेचे घेतलेले sab चाचणी करता पाठवल्याचे सांगितले. यासाठी तिच्याकडून १ हजार रुपये आकारले. पण प्रत्यक्षात मोहम्मद सलीम मोहम्मद उमर यानं महिलेचे swab चाचणी करता न पाठवता ऑनलाइन पद्धतीनं covid-19 चा अहवाल डाऊनलोड करून त्यात छेडछाड केली.

पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी अधिक तपास केला असता मोहम्मद सलीम यानं अशाप्रकारे जवळपास ३७ नागरिकांचे बनावट कोविड अहवाल तयार केल्याचं समोर आलं. त्यानुसार मोहम्मद सलीम मोहम्मद उमर याला कलम याला अटक करण्यात आली.



हेही वाचा

व्हेंटिलेटरसाठी १५ लाखांच्या लाचेची मागणी, ठाणे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला अटक

सहप्रवाशाने सुरू केले अश्लील चाळे, महिलेची रिक्षातून उडी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा