गुंड फहिम मचमचच्या हस्तकाला अटक

बांधकाम आणि चीन व दुबईहून इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची आयात करणाऱ्या व्यावसायिकाने ही तक्रार केली होती. त्याने तीन वर्षांपूर्वी अश्‍फाक रफिक टॉवलवाला याच्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. त्याला अश्‍फाककडून १५ लाख ५० हजार रुपये येणे होते.

गुंड फहिम मचमचच्या हस्तकाला अटक
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक फहिम मचमचच्या नावाने व्यावसायिकाला धमकवणाऱ्या हस्तकाला मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अहमद राजा अफ्रोज वधारिया असे या आरोपीचे नाव आहे. दुबईवरून मुंबईला येणाऱ्या वधरियाला "लुक आऊट सर्क्‍युलर'च्या (एलओसी) आधारावर पकडण्यात आले.


धमकीचा दूरध्वनी

बांधकाम आणि चीन व दुबईहून इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची आयात करणाऱ्या व्यावसायिकाने ही तक्रार केली होती. त्याने तीन वर्षांपूर्वी अश्‍फाक रफिक टॉवलवाला याच्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. त्याला अश्‍फाककडून १५ लाख ५० हजार रुपये येणे होते. त्यासाठी त्याने अनेकदा मागणी केली होती. त्याला १२ जूनला धमकीचा दूरध्वनी आला. दूरध्वनीवरील व्यक्तीने आपण फहिम मचमच असल्याचे सांगितले. वधरियाचा निकटवर्तीय असलेल्या टॉवलवालाकडून पैशाची मागणी करू नकोस, अशी धमकी त्याने तक्रारदाराला दिली. त्यानंतर १३ आणि१६ जूनला वधरियाकडूनही धमकीचे दूरध्वनी आहे. त्यावेळी त्याने दूरध्वनी रेकॉर्ड करून या तिघांविरोधात मुंबई पोलिसांना तक्रार दिली. त्यावेळी गुन्हा दाखल करून दुबईवरून परतल्यानंतर अहमदला अटक करण्यात आली.


खंडणी, धमकावण्याचा गुन्हा 

रेकॉर्ड करण्यात आलेला आवाज व अहमदचा आवाज यात साम्य आहे. अहमद हा मचमचसाठी मुंबईतील व्यावसायिकांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होता. २०१६ मध्ये तो मचमचच्या संपर्कात आला. याप्रकरणी अहमद, अश्‍फाक व यांच्यासह मचमचविरोधात खंडणी व धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक याप्रकरणी अधिक तपास करत आहे.



हेही वाचा -

६ कोटींच्या कोकेनसह नायजेरियन तस्कराला अटक

पोटात लपवून आणले जात होते ड्रग्ज




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा