विनापरवाना भारतात वास्तव्य, अफगाणिस्तानचा तरुण अटकेत

मूळचा अफगाणिस्तानचा रहिवाशी असललेला माजिद १८ नोव्हेंबर २०१७ मध्ये माजिद खान उर्फ हजरत शहा या नावाच्या पासपोर्टवर भारतात आला होता. भारतात तो विरारच्या एकता सेंट्रल पार्क, डोंगरी ग्लोबल सिटी टाॅवर मध्ये राहत होता. भारतात आल्यानंतर त्याने त्याची ओळख लपवण्यासाठी अफगाणिस्तानचे पासपोर्ट फाडून जाळले.

विनापरवाना भारतात वास्तव्य, अफगाणिस्तानचा तरुण अटकेत
SHARES

ओळख लपवून भारतात मागील दोन वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ३१ वर्षीय अफगाणिस्तानच्या व्यक्तीस मुंबईच्या गुप्तचार विभाग (सीआयू)च्या पोलिसांनी अटक केली आहे. माजिद खान शहा उर्फ हजरत शहा उर्फ मिराज तारीख खान असं या आरोपीचं नाव आहे. विरार परिसरात हा घर खरेदी करून राहत होता. 


आधार, पॅनही बनवले

मूळचा अफगाणिस्तानचा रहिवाशी असललेला माजिद १८ नोव्हेंबर २०१७ मध्ये माजिद खान उर्फ हजरत शहा या नावाच्या पासपोर्टवर भारतात आला होता. भारतात तो विरारच्या एकता सेंट्रल पार्क, डोंगरी ग्लोबल सिटी टाॅवर मध्ये राहत होता. भारतात आल्यानंतर त्याने त्याची ओळख लपवण्यासाठी अफगाणिस्तानचे पासपोर्ट फाडून जाळले. त्यानंतर तो मिराज खान या नावाने वास्तव्य करत होता. श्याम नावाच्या एका व्यक्तीने त्याला बनावट नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड आणि जन्मदाखलाही दिला होता. भारतात आल्यानंतर त्याने सांताक्रूझच्या वाकोला परिसरात राहणाऱ्या शबनम अझ्झरूद्दीन हाजी फजीर (४७) हिच्यासोबत विवाह केला. 


खाकीचा धाक

याबाबतची माहिती गुप्तचार विभागाला मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. त्याच्याजवळ चौकशी केली असता. त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर त्याने कबूली दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिराज विरोधात ४१७,४१९,४६५,४६७,४६८,४७१,३४ भा.द.विसह भारतीय पारपत्र १२ (अ) आणि फाँरेन अक्ट १४,१४(क) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिस त्याच्याजवळ सखोल चौकशी करत आहेत.  



हेही वाचा -

सुट्या पैशांवरून झालेल्या वादातून बसवर दगड भिरकाव

रेल्वेत नोकरीच्या नावाखाली ७ तरुणांना ३० लाखांचा गंडा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा