भिंवडी दंगलीतील मुख्य सूत्रधाराला अटक

फरार युसूफविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती. दरम्यान युसूफ शनिवारी सौदी अरेबिया इथून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतलं. याबाबतची माहिती विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी भिंवडी पोलिसांना दिल्यानंतर शनिवारी भिवंडी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.

भिंवडी दंगलीतील मुख्य सूत्रधाराला अटक
SHARES

भिंवडीच्या निजामपूरात दंगल घडवण्यासाठी कारणीभूत असलेला फरार आरोपी मोहम्मद युसूफ मो. इब्राहिम मोमीन उर्फ युसूफ रझाला पोलिसांनी शनिवारी मुंबई विमानतळाहून अटक केली. मोहम्मद युसूफ हा रजा अकादमी संघटनेचा शहर अध्यक्ष असून त्याच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.


काय आहे भिवंडी प्रकरण?

भिंवडीत २००६ साली शहरातील क्वॉर्टर गेट मशिदीसमोर निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास मोहम्मद युसूफ हा संघटनेचा आधार घेऊन विरोध करत होता. नागरिकांची माथी भडकवल्याने त्यावेळी मोठी दंगल उसळली होती. युसूफसह उपस्थित जमावाने पोलिसांना विरोध दर्शवत पोलिसांवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत तात्कालिन पोलिस उपायुक्त आर. डी. शिंदे सह ३९ पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.


पोलिसांची हत्या

यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांना गोळीबारही करावा लागला होता. या गोळीबारात २ आंदोलक मृत्यूमुखी पडले होते. मात्र नंतर मध्यरात्री अचानक जमावाने दोन पोलिस कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या केली होती. संतप्त जमावाने त्यावेळी ५ ते ६ एसटी बसची मोडतोड करत जाळपोळ केली होती. या दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात इतर ठिकाणी उमटण्याच्या पूर्वीच सरकारने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल मुख्य सूत्रधार मोहम्मद युसुफसह ४०० जणांवर गुन्हे दाखल केले होते.


तरीही अटक नाही...

या दंगलीप्रकरणी सुमारे ७ ते ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान २ वर्षांपूर्वी दंगलीतील १८ आरोपींची २ वर्षांपूर्वी ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहम्मद युसूफ फरार झाला होता. विशेष म्हणजे त्याचा वावर भिवंडी परिसरात असूनही अटक करण्यात आली नव्हती.


१४ दिवसांची पोलिस कोठडी

फरार युसूफविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती. दरम्यान युसूफ शनिवारी सौदी अरेबिया इथून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतलं. याबाबतची माहिती विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी भिंवडी पोलिसांना दिल्यानंतर शनिवारी भिवंडी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. या प्रकरणी न्यायालयाने मोहम्मद युसूफला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील ७ ते ८ आरोपींचा अद्याप पोलिस शोध घेत आहे.



हेही वाचा-

लाचखोर पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

८७ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दुबईच्या व्यावसायिकाला अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा