राजश्री लाॅटरीचं बनावट वेबपेज, ग्राहकांची लाखोंची लूट

मालाडच्या मालवणी परिसरातील स्काॅटर्स काॅलनी, गेट नं ७ बस स्टाॅपच्या मागे अल्पेशने राजश्री लाॅटरी सेंटर सुरू केलं होतं. या लाॅटरी सेंटरचं नाव जरी शासनमान्य राजश्री लाॅटरी असं असलं, तरी अल्पेशने भाग्यश्री लाॅटरी या नावाने नवीन वेबपेज बनवलं होतं. लाॅटरी खेळायला येणाऱ्या ग्राहकांना राजश्री ऐवजी तो भाग्यश्री लाॅटरीच्या तिकिटांची विक्री करूत शासनाचा महसूल बुडवायचा.

राजश्री लाॅटरीचं बनावट वेबपेज, ग्राहकांची लाखोंची लूट
SHARES

राजश्री लाॅटरी या शासनाच्या आॅनलाइन लाॅटरीच्या वेबपेजसारखं बनावट वेबपेज बनवून त्याद्वारे ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू केला आहे.


कुणाचा समावेश?

अल्पेश जमनादास बतीया (३४), झहिरूद्दीन शेख (४५), कादरबाशा शेख (४१) आणि नरेंद्र कानानी (५२) अशी या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींवर पोलिसांनी भादंवि ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४, ११४ आणि लाॅटरी रेग्युलेशन कायदा १९९८ सह ४, १२, अ जुगार प्रतिबंधक कायद्यासह ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


फक्त नावचं राजश्री लाॅटरी

मालाडच्या मालवणी परिसरातील स्काॅटर्स काॅलनी, गेट नं ७ बस स्टाॅपच्या मागे अल्पेशने राजश्री लाॅटरी सेंटर सुरू केलं होतं. या लाॅटरी सेंटरचं नाव जरी शासनमान्य राजश्री लाॅटरी असं असलं, तरी अल्पेशने भाग्यश्री लाॅटरी या नावाने नवीन वेबपेज बनवलं होतं.


निकालातही फेरफार

लाॅटरी खेळायला येणाऱ्या ग्राहकांना राजश्री ऐवजी तो भाग्यश्री लाॅटरीच्या तिकिटांची विक्री करूत शासनाचा महसूल बुडवायचा. एवढ्यावरच न थांबता राजश्री लाॅटरीच्या रिझल्टमध्ये फेरफारकरून हा बनावट रिझल्ट भाग्यश्री लाॅटरीच्या पेजवर टाकयाचा. त्यामुळे ग्राहकांना कधीच लाॅटरी लागायचीच नाही आणि सगळे पैसे अल्पेशच्या गल्ल्यात जमा व्हायचे.


बिलेही छापली

यासाठी त्याने संगणक आणि प्रिंटरच्या मदतीने बनावट लाॅटरीची बिलंही त्याने छापली होती. या भाग्यश्री लाॅटरीच्या वेबपेजचं सर्व्हर चारकोपच्या सन रे शाॅपिंग सेंटर इथून चालवण्यात येत होतं.

ग्राहकांनी मालवणी पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या लाॅटरी सेंटरवर छापा टाकून आरोपींकडून साडे तीन लाखांची रोकड, लाॅटरीची तिकिटे, ५ संगणक, ३ मोबाइल हस्तगत केले आहेत. अशा पद्धतीने अन्य किती ठिकाणी आरोपीने लाॅटरी सेंटर सुरू केलं आहे. या फसवणुकीत अन्य किती जणांनी त्याला मदत केली, याचा पोलिस शोध घेत आहेत.



हेही वाचा-

शिवसेनेचा पदाधिकारी खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड

दिग्दर्शक रेमो डिसुझाला धमकी: पुजारी टोळीच्या हस्तकाला अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा