शिवसेनेचा पदाधिकारी खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड

पवईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय असणाऱ्या हिरानंदानी यांच्याबाबत विविध सरकारी कार्यालयांमध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज पाखरे याने केले होते. माहिती अधिकाराखाली मिळालेली माहिती लपवण्यासाठी पाखरे हिरानंदानीकडे सतत खंडणी मागायचा. पैसे न दिल्यास सर्व माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघड करून विकासकाला अडचणीत आणण्याची धमकी द्यायचा.

शिवसेनेचा पदाधिकारी खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध विकासक निरंजन हिरानंदानी यांच्याकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला पवई पोलिसांनी बुधवारी अटक केली. गुलाब पाखरे असं या आरोपीचं नाव आहे. पाखरे याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पाखरे हा पुण्याच्या जुन्नर येथील जिल्हा परिषदचे सदस्य असल्याची माहिती पोलिस उपायुक्त एन रेड्डी यांनी दिली.


माहिती अधिकाराचा गैरवापर

पवईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय असणाऱ्या हिरानंदानी यांच्याबाबत विविध सरकारी कार्यालयांमध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज पाखरे याने केले होते. माहिती अधिकाराखाली मिळालेली माहिती लपवण्यासाठी पाखरे हिरानंदानीकडे सतत खंडणी मागायचा. पैसे न दिल्यास सर्व माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघड करून विकासकाला अडचणीत आणण्याची धमकी द्यायचा.


२० कोटींची मागणी

काही महिन्यांपूर्वीच पाखरे हिरांनदानी यांच्याकडून १० लाख रुपये घेऊन गेला होता. मात्र तेवढ्यावर त्याचं समाधान होत नसल्याने त्याने माहिती उघड न करण्यासाठी विकासकाकडे २० कोटी रुपयांची मागणी हिरानंदानी यांच्याकडे केली. मात्र पाखरे यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने हिरानंदानी यांनी आपल्या प्रतिनिधीद्वारे पवई पोलिसांत पाखरे विरोधात तक्रार नोंदवली. सोबतच खंडणीची मागणी करणारी ऑडिओ रेकाॅर्डिंगसुद्धा पवई पोलिस ठाण्यात पुरावा म्हणून सादर केली.


रंगेहात अटक

या प्रकरणी पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बनवून सापळा रचण्यात आला. त्यानुसार खंडणीखोर गुलाब पाखरे याला मुलुंड येथील एका हॉटेलमधून खंडणीची २ कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.


हिरानंदानीकडेच कामाला

पाखरे पूर्वी हिरानंदानी बिल्डरकडे लायझनिंग एजंट म्हणून बरीच वर्षे कामकाज पाहत होता. गेल्या वर्षी त्याने नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. ज्यानंतर विविध सरकारी कार्यालयात हिरानंदानीविरोधात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली. ती माहिती लपवण्यासाठी तो २० कोटी रुपयांची खंडणी मागत होता. पाखरे याने वापरलेली फाॅर्च्युनर कारसुद्धा पवई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

विकासकाच्या आर्थिक स्थितीची माहिती असल्यामुळे केवळ पैसे उकळण्यासाठीच त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकऱणी पवई पोलिसांनी भादंवि कलम ३८४ (खंडणी) नुसार गुन्हा दाखल करून पाखरे याला अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांनी दिली.



हेही वाचा-

पैशाच्या वादातून वेश्येची हत्या, १२ तासांत आरोपी जेरबंद

बारावी 'केमिस्ट्री'चा पेपर व्हॉट्सअॅपवर, अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा