चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणारी टोळी अटकेत


चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणारी टोळी अटकेत
SHARES

रकीय चलनात ट्रेडिंग करून जास्त फायदा मिळून देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा ३ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या १० जणांना पोलिस कोठडी सुनावली आहे.


कशी केली फसवणूक?

आरोपींनी 'मनी ट्रेडिंग डॉट कॉम' नावाची बोगस वेबसाइट सुरू करून त्यावरून गुंतवणूकदारांना परकीय चलनात ट्रेडिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली. यामाध्यमातून मोठा फायदा मिळवून देण्याच्या बहाण्याने ५०० जणांना या टोळीने पैसे गुंतवायला सांगितले. दादर येथील प्रीतम हॉटेलसमोर असलेल्या मेसर्स मल्टी बिझनेस सर्व्हिसेस नावाच्या कंपनीच्या कार्यालयातून ही फसवणूक सुरू होती.


मुद्देमाल हस्तगत

आरोपींनी सॉफ्टवेअरमध्ये बदल करून सुरूवातीला गुंतवणूकदारांना बोनस स्वरूपात पैसे मिळाल्याचं दाखविलं. त्यानंतर अधिक गुंतवणूक करण्यास भाग पडून गुंतवणूकदारांची फसवणूक केली. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात ९६ लॅपटॉप, १७ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.


कुणाचा समावेश?

या प्रकरणी कंपनी संचालक तन्वीर शेख (३२), असद शेख (२७) आणि शाहरुख शेख (२५ ) या तीन भावांना आणि व्यंकटाचलम मरिअप्पा (२८), फैयाज उमर शेख (४०), संजय वैष्णव (२८), परवेज मकबूल खान (४०), मोहम्मद जाफर शेख (२७), इम्रान मूकबल खान (३४) आणि अजरुद्दीन दाऊदअली शेख (२८) यांना अटक करण्यात आली आहे.

या ठगांनी ५०० जणांकडून ६ कोटी ३६ लाख रुपये उकळले होते. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ३४ आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा २००००, ६६ (अ) (ब), ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा-

सोलापूरात बँक फोडण्याचा प्रयत्न; चौकडीला मुंबईत अटक

रेल्वे प्रवाशांना लुटणारे चोरटे जेरबंद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा