'भारत बंद' आंदोलन: ८८२ आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मेट्रो रेल्वेच्या डी. एन. नगर स्थानकातील रुळावर उतरून मेट्रो रोखून धरणाऱ्या ७ मनसैनिकांना महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) च्या जवानांनी ताब्यात घेतलं. या सातही जणांना नंतर पुढील कारवाईकरता अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर मालापूर्वेकडील भाजपा नगरसेवकावर हल्ला आणि त्याच्या कार्यालयाची मोडतोड केल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

'भारत बंद' आंदोलन: ८८२ आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात
SHARES

काँग्रेससह विरोधकांनी पुकारलेल्या 'भारत बंद'मध्ये सहभागी आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी आता धऱपकड सुरू केली आहे. दिवसभरात विविध ठिकाणाहून पोलिसांनी ८८२ आंदोलकांना आतापर्यंत ताब्यात घेतलं आहे. तर ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ६ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्यांचा समावेश

'भारत बंद'चा नारा देत सोमवारी सकाळपासूनच विरोधी पक्षनेत्यांनी एकवटत मुंबईत विविध ठिकाणी आंदोलनं केली. पश्‍चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम आणि माणिकराव ठाकरे आदी. नेतेमंडळी रेल्वे ट्रॅकवर उतरली. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच डी.एन. नगर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं.

दादरमधून मनसे पदाधिकारी ताब्यात

तर दादर पश्‍चिमेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. याप्रकरणी मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, पदाधिकारी यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे, स्नेहल जाधव, रिटा गुप्ता यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना देखील सेनाभवन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. वरळी नाका इथंही मनसेच्या वतीने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिथंही काही कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले.

भाजपा कार्यालयाची तोडफोड

मेट्रो रेल्वेच्या डी. एन. नगर स्थानकातील रुळावर उतरून मेट्रो रोखून धरणाऱ्या ७ मनसैनिकांना महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) च्या जवानांनी ताब्यात घेतलं. या सातही जणांना नंतर पुढील कारवाईकरता अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर मालापूर्वेकडील भाजपा नगरसेवकावर हल्ला आणि त्याच्या कार्यालयाची मोडतोड केल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काही कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान बेस्टच्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. तसंच, प्रतिक्षानगर बस डेपोमध्येसुद्धा काही बसची तोडफोड करण्यात आली. या बसेसची तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा-

शिवसेनेला स्वत: ची भूमिकाच नाही-राज ठाकरे

मुंबईत काँग्रेसचा बंद मनसेकडून हायजॅक?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा