Advertisement

देशात कुठेही हिंसाचार नाही, बंद १०० टक्के यशस्वी- अशोक चव्हाण

बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला. बंद यशस्वी करण्यासाठी ज्या काँग्रेस नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी तसंच इतर पक्षाच्या नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, त्या सर्वांचे आभारही त्यांनी मानले.

देशात कुठेही हिंसाचार नाही, बंद १०० टक्के यशस्वी- अशोक चव्हाण
SHARES

इंधनदरवाढीविरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला मुंबईसह देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एवढंच नव्हे, तर बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला. बंद यशस्वी करण्यासाठी ज्या काँग्रेस नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी तसंच इतर पक्षाच्या नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, त्या सर्वांचे आभारही त्यांनी मानले. जे सरकार इंधनाचे दर कमी करणं आपल्या हातात नाही, असं म्हणत हे सरकार सरकार चालवण्यातच अपयशी ठरलं, असं म्हणत चव्हाणांनी भाजपावरही निशाणा साधला.


शिवसेनेशिवायही बंद यशस्वी

शिवसेनेनं बंदमधून माघार घेतली तरीही बंद यशस्वी झाला. मुंबईत केवळ शिवसेनाच १०० टक्के बंद यशस्वी करते असं नाही, तर शिवसेना नसतानाही बंद १०० टक्के यशस्वी होतो, असा दावा करत संजय निरूपम यांनी सेनेवर तोंडसुख घेतलं.


भाजपाचे हात वर

इंधनदरवाढीविरोधात काँग्रेसनं सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पुकारण्यात आलेल्या या बंदला मुंबई-ठाणे-नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. एकीकडे काँग्रेसचा बंद सुरू असतानाच भाजपाचे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत इंधनदरवाढ कमी करणं आपल्या हातात नाही, असं सागंत चक्क हात वर केले.


सर्वसामान्यांचे प्रश्न काय सोडवणार?

भाजपाने झटकलेल्या जबाबदारीवरही चव्हाण यांनी हल्ला चढवला. इंधनाला 'जीएसटी'च्या कक्षेत आणत इंधनदरवाढ कमी करता येणं शक्य असताना केंद्र सरकार दरवाढ कमी करणं आपल्या हातात नाही, असं सांगतंय. जे सरकार दर कमी करू शकत नाही ते सर्वसामान्यांचे प्रश्न काय सोडवणार? त्यामुळे भाजपा सरकार चालवण्यास सक्षम नसल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.


कुठेही हिंसाचार नाही

बंददरम्यान दगडफेक आणि एसटी, बेस्टच्या गाड्या फोडण्याच्या घटना घडल्या. तरीही काँग्रेसने बंददरम्यान कुठंही हिंसा न घडल्याचा दावा केला. शिवसेना या बंदमध्ये सहभागी न झाल्याने शिवसेनेचा खरा चेहरा मुंबईकरांसमोर आला, सेना सत्तेसाठी किती लाचार आहे हे समोर आलं, अशी टीका चव्हाणांनी केली.


'तुम्ही तर अजून झोपेतच'...

काँग्रेसला उशीरा जाग आल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती, त्याला उत्तर देताना चव्हाणांनी राऊतांना धारेवर धरलं. आम्हाला उशीरा का होईना पण जाग आली, तुम्ही अजून झोपेतच आहात, असा टोमणाही चव्हाणांनी मारला. युवा सेनेकडून मुंबईसह महाराष्ट्रातील पेट्रोल पंपावर 'यही है अच्छे दिन', असे इंधनदरवाढीविरोधातील, भाजपाविरोधातील पोस्टर लावले आहेत. असे पोस्टर लावून काही होत नाही, असंही यावेळी चव्हाण म्हणाले.



हेही वाचा-

इंधनदरवाढीच्या भडक्यावर भाजपाचे हात वर, सर्वसामान्यांना दिलासा नाही?

मुंबई-ठाणे-नवी मुंबईत बंदला सुरुवात, मनसे-काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा