गणपती विसर्जनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

शहरातील प्रमुख चार चौपाट्यांवर ड्रोन कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जाणार आहे. तब्बल ५० हजार पोलिस 119 विसर्जन ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गणपती विसर्जनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
SHARES
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते. त्यावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गणेश विसर्जन विनाअडथळा, शांततेत व सुरक्षित पार पडावं, यासाठी शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी तब्बल ५० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलं आहेत. त्याच बरोबर विसर्जनादिवशी वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून ५३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. 

सुट्ट्या रद्द 

विसर्जनादरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.  शहरातील प्रमुख चार चौपाट्यांवर ड्रोन कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जाणार आहे. तब्बल ५० हजार पोलिस ११९ विसर्जन ठिकाणी  बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे विसर्जना दरम्यान ३५०० वाहतूक पोलिस वाहतूक नियञंण ठेवणार आहेत. पोलिसांना मदत म्हणून ५०० ट्राफीक वाँर्डन आणि स्वयंसेवक मदतीला असणार आहेत. विविध ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या मार्गावर वॉच टॉवर उभारले जाणार आहेत. याशिवाय ५००० सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे मुख्य नियंत्रण कक्षातून नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर विसर्जनावेळी मुंबईच्या गिरगाव, शिवाजी पार्क, जुहू आणि मालवणी समुद्रकिनारी ड्रोन कॅमेऱ्यांवरून नजर ठेवली जाणार आहे.


शेकडो जीवरक्षक कार्यरत

समुद्रकिनारी शेकडो जीवरक्षक समुद्रात लक्ष ठेवून असतील. तसेच शहरातील पाच प्रमुख चौपाट्यांवर पोलिसांनी विसर्जन नियंत्रण कक्ष बनवण्यात आले असून भाविकांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. कायदा व सुव्यवस्तेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून राखीव पोलिस दलाच्या १२ तुकड्या,  सशस्ञ दल,  दंगल नियंञण पथक, जलद प्रतिसाद पथक आणि बीडीडीएस चे पथक तैनात असणार आहेत. 


५३ रस्ते बंद

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ५३ रस्ते बंद ठेवण्यात आले असून ५४ रस्ते एकदिशा मार्ग केले आहेत. तसेच ९९ रस्त्यांवर नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना कोणतिही मदत हवी असल्यास पोलिस नियंञण कक्ष क्रमांक १००, ट्विटर आणि संदेश  झाल्यास 7738133133 /7738144144 या क्रमांकावर पाठवावा असे आवाहन मुंबई पोलिसांकडून केले आहे. हेही वाचा -

लाइव्ह अपडेट्स : गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक

रल्वेप्रमाणं एसटी महामंडळही प्रवाशांना पुरवणार पाण्याची सुविधाRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा