कंगनाच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडिओची होणार चौकशी

पावसाळी अधिवेशनात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते की, कंगना व अध्ययन सुमन यांच्या असलेले संबंध व अमली पदार्थांचे कनेक्शन याबद्दल चौकशी केली जाणार

कंगनाच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडिओची होणार चौकशी
SHARES

मुंबईत सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने उडी घेत वाद ओढावून घेतला. मात्र तिच्या बेधडक वक्तव्यांनी तिला आता अडचणीत आणले आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या एका व्हायरल व्हिडिओत तिने आपण पूर्वी ड्रग्ज घेत असल्याचा खुलासा केला होता. तर अध्ययन सुमन यानेही एका मुलाखतीत तशी कबूली दिल्याने मुंबई पोलिस कंगनाच्या त्या व्हिडिओची आता चौकशी करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा:-सुशांत आत्मत्येनंतर ड्रग्ज वितरक भूमीगत

सुशांत आत्महत्या प्रकरणात आपल्या बेधडक वक्तव्यावरून  कंगना राणावतच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी पालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई केली. त्यानंतर कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर तिच्यावर चौफेर टिका झाली. यानंतर तिचा आता एक व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल होत आहे. त्यात कंगना काही वर्षांपूर्वी पार्ट्यांमध्ये ड्रग्स घेत होती. तिला तिच्या पेयात नकळत ड्रग्स दिले जात होते. त्यामुळे तिच्या आयुष्यात तिला बरेच चढ-उतार पहावे लागले असल्याचे तिने म्हटले आहे. अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याच्या सोबत कंगणाचे प्रेम संबंध होते. स्वतः अध्ययन सुमन यानेही एका मुलाखतीत कंगना ही अमली पदार्थ घेत असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा:-आणखी एका बँकेत घोटाळा, मुंबईत सीबीआयचे चार ठिकाणी छापे

नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते की, कंगना व अध्ययन सुमन यांच्या असलेले संबंध व अमली पदार्थांचे कनेक्शन याबद्दल चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले होते. आता कंगना रणौत हिच्या संदर्भात मुंबई पोलीस कसा तपास करणार आहे व त्याचे स्वरूप कसे असणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा