इन्स्टाग्राममुळे 'त्या' बेपत्ता मुलींचा लागला शोध

मेघवाडीच्या इंदिरानगर परिसरात राहणारी १७ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली. तिच्या मित्र-मैत्रिणींकडून मुलीबाबत घरातल्यांना कोणतीही माहिती मिळत नव्हती. मुलीचा फोन हा बंद येत असल्याने घरातल्यांनी मेघवाडी पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदवला.

SHARE
मुंबईच्या पश्चिम उपनगरात अचानक बेपत्ता झालेल्या तीन तरुणींचा शोध लावण्यात मेघवाडी पोलिसांना यश आलं आहे. या तिघी तरुणी बेपत्ता असल्याची नोंद मुंबईच्या तीन विविध पोलिस ठाण्यात होती. मात्र यातील एक तरुणी ही इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तिचा माग काढला.

मेघवाडीच्या इंदिरानगर परिसरात राहणारी १७ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली. तिच्या मित्र-मैत्रिणींकडून मुलीबाबत घरातल्यांना कोणतीही माहिती मिळत नव्हती. मुलीचा फोन हा बंद येत असल्याने घरातल्यांनी मेघवाडी पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदवला. त्यानुसार मेघवाडी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. मुलीचा फोन बंद येत होता. तिच्या फेसबक अकाऊंटवरूनही काही थांगपत्ता लागत नव्हता. अशातच पोलिसांना एक आशेचा किरण मिळाला. बेपत्ता मुलगी इन्स्टाग्रामहून तिच्या मित्राच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं.

पोलिस चौकशीत त्या तरुणाला बेपत्ता तरुणीने ती गोव्यात असल्याचे सांगितलं. मात्र तपासात मुलीचे खाते हे शिर्डीतून अॅक्टिव्ह असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार मुलीच्या मित्राच्या मदतीने पोलिसांनी शिर्डी येथून बेपत्ता मुलीचा शोध घेतला. त्यावेळी पीडित बेपत्ता मुलींबरोबर अन्य दोन तिच्या अल्पवयीन मैत्रिणीही होत्या. त्या दोघींच्या घरातल्यांनीही आरे आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली होती. या मुली मेघवाडी पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे सापडल्याने त्यांच्या घरातल्यांचा जीव भांड्यात पडला. त्या मुली पळून जाण्यामागचं कारण अद्याप समजू शकले नसून पोलिस तपास करत आहेत.हेही वाचा -
संबंधित विषय
ताज्या बातम्या