मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यामागे इंडियन मुजाहिद्दीन?, कनेक्शनचा शोध सुरू

नामांकीत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी नेमकी ठेवली कुणी? याचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून शोध घेतला आहे.

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यामागे इंडियन मुजाहिद्दीन?, कनेक्शनचा शोध सुरू
SHARES

नामांकीत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी नेमकी ठेवली कुणी? याचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून शोध घेतला आहे. त्यातच या प्रकरणाची लिंक इंडियन मुजाहिद्दीनशी तर नाही ना याचाही पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान कार पार्क करणारी एक व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली असून संबंधित व्यक्तीने मास्क घातल्याने आणि डोकं हुडीने झाकल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कार चेसीस क्रमांकाद्वारे गाडी मालकापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं असून ही कार काही दिवसांपूर्वीच विक्रोळीतून चोरीला गेल्याचीही माहिती पुढं आली आहे.

हेही वाचा- नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है, स्कॉर्पिओमध्ये सापडलं धमकीचं पत्र

मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एक स्काॅर्पिओ गाडी बुधवारी मध्यरात्री उभी करण्यात आली होती. या गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या खळबळजनक घटनेनंतर अंबानी यांच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

तर दुसरीकडे पोलिसांच्या तपासानेही वेग घेतला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या तपासासाठी १० पथकं तयार करण्यात आली आहेत. ही सर्व पथकं परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयास्पद लोकांची माहिती मिळवण्याच्या कामाला लागली आहेत. 

मुंबई पोलिसांना या कारममध्ये एक पत्रही आढळलं आहे. नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या या सदस्याने २०१३ मध्ये अंबानी यांच्या मरिन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकीचं एक पत्र पाठवलं होतं. या प्रकरणातही असंच एक पत्र हाती आल्याने या प्रकरणाची लिंक इंडियन मुजाहिद्दीनशी तर नाही ना याचा तपास करण्याची जबाबदारी देखील एका पथकावर सोपवण्यात आली आहे. 

(mumbai police searching link with indian mujahideen with mukesh ambani house suspected car park case)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा