पोलिसांच्या समन्सला कंगनाने दिलं सोशल मिडियावरून हे उत्तर


पोलिसांच्या समन्सला कंगनाने दिलं सोशल मिडियावरून हे उत्तर
SHARES

घर तोडल्यानंतर कंगनाने शिवसेनेवर टिका करताना, आक्षेपार्ह टिका केली होती. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने तिच्यासह रंगोलीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून कंगना आणि रंगोलीला चौकशीसाठी समन्स बजावले. त्यावर सोशल मिडियातून उत्तर देताना कंगनाने पून्हा सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचाः- सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय?

सुशांत  सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने उडी घेतल्यानंतर वातावरण चांगलेच खवळून निघाले. कंगनाच्या दाव्यानंतर बाँलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश झाला होता. यात कंगनाने सत्ताधारी शिवसेनेला अंगावर घेतल्यानंतर वाद चांगलाच पेटला. त्यातपालिकेने केलेल्या कारवाईनंतर कंगनाने सत्ताधाऱ्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले. या विरोधात कंगनावर कारवाई व्हावी म्हणून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत कंगनाला चौकशीला बोलावले. त्यावर कंगनाने सोशल मिडियावरून प्रतिउत्तर दिले आहे.   अभिनेत्री कंगना रणौतने शिवसेनेवर निशाणा साधत पोलिसांच्या समन्सला उपरोधिकपणे उत्तर दिलं आहे. “पेंग्विन सेना..महाराष्ट्राचे पप्पूप्रो, माझी फार आठवण येते आहे. क-क-क-क-कंगना. काही हरकत नाही, मी लवकरच येईन”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. दरम्यान, कंगना आणि रंगोली यांच्यावर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. त्यामुळे या दोघींना पुढील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी (२६ आणि २७ ऑक्टोबर) तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचाः- जी उत्तर विभागातील वरळी परिसर रुग्णसंख्येत शेवटच्या क्रमांकावर

दोन समाजात तेढ पसरवणाऱ्या वक्तव्याबाबत कंगना आणि तिची बहिण रंगोली यांच्याविरोधात वांद्र्यातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर कोर्टाने त्या दोघींवर गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार वांद्रे पोलिसांत या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. तसेच कंगनाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं. सीएएबाबत अफवा पसरवणारे आणि दंगल घडवणारे लोकच आत्ता कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती पसरवून देशात ते दहशतीचं वातावरण पसरवत असल्याचं तिनं म्हटलं होतं. याप्रकरणी कर्नाटकातील कोर्टात तिच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणीही कोर्टाने कंगनावर एफआयआर दाखल करुन चौकशीचे आदेश दिले होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा