मालवणी आणि देवनारमध्ये पूर्ववैमनस्यातून हत्या

मालवणीत रिक्षा पार्किंगच्या वादातून काही टवाळखोरांनी हप्ता देत नाही म्हणून एकाला ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मालवणी आणि देवनारमध्ये पूर्ववैमनस्यातून हत्या
SHARES

मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे  पार्किंगचा प्रश्न हा दिवसेंदिवस गहन होऊ लागला आहे. मालवणीत रिक्षा पार्किंगच्या वादातून काही टवाळखोरांनी हप्ता देत नाही म्हणून एकाला ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. तर तीन आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

हेही वाचाः- प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट, ‘या’ निर्णयावर सर्वांचे एकमत

मालाडच्या मालवणी परिसरात लाँकडाऊनमुळे असंख्य रिक्षा या रस्त्यावर उभ्या आहेत. पार्किंमध्ये उभ्या करण्यात आलेल्या रिक्षाचा व्यवसाय तक्रारदार मोहम्मद शेखने सुरू केला होता. त्यामुळे तेथील टवाळखोरांनी मोहम्मकडे हप्त्यासाठी तगादा लावला होता. दरम्यान मंगळवारी १.३० वा. मोहम्मद त्याचा मित्र अल्ताफ अन्सारी याच्यासोबत उभा असताना.  त्या ठिकाणी आरोपी नजीर शेख, बल्लू शेख, तैय्यब शेख उर्फ शेरू, फरीद अन्सारी, फिरोज जुम्मा, आबिद आणि अज्जूसह अन्य तीन जण उभे होते. त्यावेळी आरोपींनी मोहम्मदला घेऊन पार्किंगचा व्यवसाय सुरू केल्याबद्ददल हप्ता मागितला. तो मोहम्मदने देण्यास नकार दिल्याच्या वादातून या टवाळखोरांनी मोहम्मदसह अल्ताफला मारहाण करण्यास सुरूवात केली.  या टवाळखोरांनी अल्ताफचा मोबाइल हिसकावून घेत, त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. या हल्यात अल्ताफ गंभीर जखमी झाला. त्याला उपचारा करता नेले असता डाँक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालवणी पोलिसांनी ७ जणांविरोधात पोलिसांनी ३०२,३०७,३२४,३८५,३९३,१४१,१४२ १४३, १४४, १४७,१४८,१४९,१८८, भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यातील ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दुसऱ्या गटाकडून ही तक्रारदार याच्यासह ७ जणांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि सरकारी नियमांचे उल्लघंन प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचाः- Coronavirus pandemic:  मुंबईत १५६७ नवे रुग्ण, दिवसभरात ९७ जणांचा मृत्यू

तर देवनारमध्येही पूर्व वैमन्यसातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मेहराज शेख असे मृत तरुणाचे नाव आहे . मेहराज याचे त्याच परिसरातील इम्तियाज उर्फ भट्टू शेख, वसीम, साहिल शेख, अमीर उर्फ कालू, राहिल शेख याच्यासोबत वाद होता. याच वादातून आरोपींनी मेहराज यांची हत्या केली. या सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी ३०२, १४३, १४४, १४६, १४७,१४८,१८८२६९,५०४ भा.द.विसह ५१ राष्ट्रीय  आपत्ती व्यवस्थापन कायदा कोविड १९ अधिनियम ११ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा